भारतात असणाऱ्या मॅकडोनाल्ड्समधील अस्वच्छतेचा हा व्हिडिओ आहे का? वाचा सत्य

False आंतरराष्ट्रीय सामाजिक
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

मॅकडोनाल्ड्समधील अस्वच्छतेचा म्हणून समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. उंची दुकान फिकी पकवान असे म्हणत आज “मॅकडोनाल्ड्स” असं म्हणत आनंद राऊत, सुहास भुवड, प्रशांत नंदा आदींनी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या पोस्टची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

Archive

तथ्य पडताळणी

हा व्हिडिओ चार स्वतंत्र व्हिडिओंद्वारे बनलेला असल्याचे लक्षात आले. त्यानंतर आम्ही या व्हिडिओचे वेगवेगळे भाग करुन तपासाला सुरुवात केली. 

भाग – 01

सर्वप्रथम आम्ही व्हिडिओचा स्क्रीनशॉट घेतला आणि रिव्हर्स प्रतिमेद्वारे शोध घेतला. त्यावेळी मिळालेल्या परिणामात युएसए टुडे या संकेतस्थळावरील 5 ऑगस्ट 2015 रोजीचे एक वृत्त आम्हाला दिसून आले. या वृत्तानुसार हा व्हिडिओ चेकर्स फास्टफूडचा आहे.

image4.png

युएसए टुडे / Archive

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित महिला कर्मचाऱ्यास बडतर्फ करण्यात आले. फॉक्स न्यूजने याबाबत वृत्त दिले असून ते आपण खाली पाहू शकता.

image4.png

फॉक्स न्यूज / Archive

भाग – 02

दुसर्‍या व्हिडिओचा स्क्रीनशॉट शोधल्यानंतर आम्हाला आढळले की हा व्हिडिओ मलेशियाची राजधानी क्वालालंपूरमधील केएल रेस्टॉरंटचा आहे. याबाबतचे वृत्त TheStar.COM नावाच्या संकेतस्थळाने दिले आहे. ते आपण खाली पाहू शकता.

Archive

वेगवेगळ्या कीवर्डसह शोध घेत आम्हाला आढळले की, डीबीकेएल ही स्थानिक सरकारी संस्था याबाबत तपासणी करीत आहे. आपण याबाबतची माहिती खाली पाहू शकता.

image3.png

THE COVERAGE | ARCHIVE

भाग – 03

त्यानंतरच्या व्हिडिओचा स्क्रीनशॉट घेतल्यानंतर आणि वेगवेगळ्या कीवर्डसह शोध घेतल्यानंतर आम्हाला हा व्हिडिओ नोव्हेंबर 2018 मधील असल्याचे दिसून आले. जानेवारी 2019 मध्ये कॅलिफोर्नियामध्ये हा व्हिडिओ व्हायरल झाला. 25 जानेवारी 2019 रोजी Blockcluchicago या संकेतस्थळावरील वृत्तात हा व्हिडिओ जॉर्जियामधील लोव्होनिया येथील रेस्टॉरंटचा असल्याचे म्हटले आहे. जे आपण खाली वाचू शकता.

image7.png

BLOCKCLUBCHICAGO | ARCHIVE

वेगवेगळ्या कीवर्डसह शोध घेतल्यानंतर WNEGRADIO या संकेतस्थळावरील एक वृत्तात दिसून आला. या वृत्तानुसार हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे रेस्टॉरंट बंद करण्यात आले होते. ते 21 नोव्हेंबरला पुन्हा सुरु करण्यात आले. 

image6.png

WNEGRADIO | ARCHIVE

भाग – 04

त्यानंतरच्या व्हिडिओचा स्क्रीनशॉट घेतल्यानंतर आणि गुगल रिव्हर्स इमेजद्वारे शोध घेतल्यावर आम्हाला आढळले की हा व्हिडिओ गेल्या एक वर्षापासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परंतु कोठेही हा व्हिडिओ मॅकडोनाल्डचा असल्याचे दिसत नाही.

image9.png

ACEMIKAMERA | ARCHIVE

या व्हिडिओमध्येच रेस्टॉरंटचे नाव दिलेले आहे. मॅकडोनाल्डच्या नावाचा कुठेही उल्लेख दिसून येत नाही. जे आपण खाली पाहू शकता.

image5.png

याद्वारे हे सिध्द झाले की, हा व्हिडिओ चार व्हिडिओंना एकत्र करुन बनवलेला आहे. हे चारही व्हिडिओ भारतातील नसून परदेशातील आहेत. ते भारतीय मॅकडोनाल्डशी संबंधित नाहीत.

निष्कर्ष 

हा व्हिडिओ चार व्हिडिओंना एकत्र करुन बनवलेला आहे. हे चारही व्हिडिओ भारतातील नसून परदेशातील आहेत. ते भारतीय मॅकडोनाल्डशी संबंधित नाहीत. त्यामुळे याबाबतचा दावा असत्य आहे.

Avatar

Title:मॅकडोनाल्ड्समधील अस्वच्छतेचा हा व्हिडिओ आहे का? वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •