सगळ्यांनी मास्क घालणे गरजेचे नसल्याचे सांगणारा हा व्हिडिओ जुना; वाचा सत्य

Coronavirus False सामाजिक

कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी भारतात सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. समाजमाध्यमात मात्र सध्या एक व्हिडिओ क्लीप व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक तरूणी बसथांब्यावर मास्क न घालता बसलेली दिसत आहे. तिथे मास्क घालून बसलेली एक व्यक्ती युवतीला मास्क न घातल्याबद्दल विचारते. त्यावेळी युवती कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी निरोगी व्यक्तीने मास्क वापरणे गरजेचे नसून केवळ सर्दी-पडसे झाल्यास रूग्णालयात जाताना किंवा आजारी व्यक्तीची काळजी घेतानाच मुखवटा आवश्यक असल्याचे सांगते. या क्लीपच्या शेवटी आपल्याला राष्ट्रीय आरोग्य मिशन आणि मध्य प्रदेशचे लोगो दिसतात. ही क्लीप नेमकी कधीची आहे, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

फेसबुक पोस्ट / संग्रहित 

तथ्य पडताळणी

राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा किंवा मध्य प्रदेश सरकारचा हा व्हिडिओ आहे का, हे जाणून घेण्यासाठी शोध घेतला. त्यावेळी मध्य प्रदेश सरकारच्या पडताळणी केलेल्या आरोग्य विभागाच्या ट्विटर आणि फेसबुक खात्यावरून हा व्हिडिओ 18 मार्च 2020 रोजी सामाजिक करण्यात आल्याचे दिसून आले. कालांतराने हा व्हिडिओ हटविण्यात आला. 

MP.png

ट्विटर / फेसबुक

ग्वाल्हेरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या फेसबुक खात्यावरून 18 मार्च 2020 रोजी हा व्हिडिओ शेअर केला असल्याचेही आपण खाली पाहू शकता.

संग्रहित

मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा प्रसार भारतात होऊ लागला त्यावेळी जागतिक आरोग्य संघटनेने 30 मार्च 2020 रोजी पत्रकार परिषद घेत म्हटले की, जर तुम्हाला कोणतीही आजाराची लक्षणे नसतील तर तुम्हाला मास्क घालण्याची गरज नाही. तुम्ही जर आजारी असाल किंवा कोणत्याही रूग्णालयात जात असाल तर मात्र मास्क घालणे गरजेचे आहे. 

संग्रहित

याबाबत सीएनएन या वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळाने 31 मार्च 2020 रोजी दिलेले वृत्त दिले असल्याचेही दिसून येते.

CNN.png

संग्रहित

जागतिक आरोग्य संघटनेने 6 जून 2020 रोजी मात्र मास्कच्या वापराविषयी नवी मार्गदर्शक तत्वे जारी केली. यात त्यांनी म्हटले आहे की, कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने मास्क घालणे आवश्यक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकांनी ही माहिती दिली असून आपण याबाबतचा व्हिडिओ खाली पाहू शकता.

संग्रहित

निष्कर्ष 

मास्क घालणे हे सध्या अनिवार्य असून समाजमाध्यमात व्हायरल झालेला व्हिडिओ हा जुना म्हणजेच मार्च 2020 मधील आहे.

Avatar

Title:सगळ्यांनी मास्क घालणे गरजेचे नसल्याचे सांगणारा हा व्हिडिओ जुना; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False