महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड कोरोना पॉझिटिव्ह नाहीत; वाचा सत्य

Coronavirus False राजकीय

राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड हे क्वारंटाईनमध्ये होते. तेव्हापासून समाजमाध्यमांमध्ये ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती पसरत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने ते खरंच कोरोना पॉझिटिव्ह आहेत का? याची तथ्य पडताळणी केली आहे.

screenshot-www.facebook.com-2020.04.15-12_05_12.png

फेसबुकवरील मुळ पोस्ट

तथ्य पडताळणी

राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड हे कोरोना पॉझिटिव्ह आहेत का? याचा शोध आम्ही घेतला. त्यावेळी न्यूज 18 लोकमतचे 14 एप्रिल 2020 रोजीचे एक वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार ठाण्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक मिलिंद पाटील यांनी जितेंद्र आव्हाड हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा दावा केल्याचे म्हटले आहे. 

screenshot-lokmat.news18.com-2020.04.15-14_00_28.png

न्यूज 18 लोकमतचे सविस्तर वृत्त / Archive

त्यानंतर नगरसेवक मिलिंद पाटील यांच्या फेसबुक पेजला भेट दिली. पाटील यांनी याठिकाणी खूलासा करताना माध्यमांनी आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ लावल्याचे स्पष्ट करतानाच जितेंद्र आव्हाड हे हाय एक्सपोजरमध्ये असल्याचे आपले म्हणणे होते, असे स्पष्ट केले आहे. त्यांचे हे विधान आपण खाली पाहू शकता.

Archive

कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही याबाबत ट्विट करत आपण मागील महिनाभरापासून ओव्हर एक्सपोज असल्याचे सांगितले. कोरोनाबाबतचा आपला अहवाल निगेटिव्ह असल्याचे सांगतानाच त्यांनी हा अहवालही ट्विट केला आहे. 

Archive

यातून हे स्पष्ट झाले की, जितेंद्र आव्हाड यांचा कोरोना विषाणूची लागण झाल्याचा अहवाल नकारात्मक आला आहे. नगरसेवक मिलिंद पाटील यांनीही याबाबत खुलासा केला आहे.

निष्कर्ष

जितेंद्र आव्हाड यांचा कोरोना विषाणूची लागण झाल्याचा अहवाल नकारात्मक आला आहे. समाजमाध्यमात याबाबत पसरत असलेली माहिती असत्य आहे.

UPDATE:

23 एप्रिल रोजी (गुरुवारी) जितेंद्र आव्हाड यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांना एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. इंडिया टुडेने दिलेल्या बातमीनुसार, जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली. ते आणि त्यांचे कुटुंब गेल्या दोन आठवड्यांपासून घरात विलगीकरण करून राहत होते. या आधीच्या तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता.

Avatar

Title:महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड कोरोना पॉझिटिव्ह नाहीत; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False