मागील काही दिवसांपासून इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये पेटलेल्या युद्धाने सर्व जगाचे लक्ष वेधले आहे. या युद्धात हजारो निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला. तर असंख्य लोक यात जखमी झाले आहेत. तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे.

या पार्श्वभूमीवर इस्रायल आणि पॅलेस्टाई युद्धाचे दृष्य असा दावा करणारे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, पडताळणीअंती कळाले की, व्हायरल होत असलेले अनेक व्हिडिओ सध्याचे नसून जुने आहेत. तसेच काही असंबंधित आणि इतर ठिकाणांचे फोटो आणि व्हिडिओ इस्रायल आणि पॅलेस्टाई युद्धाच्या पार्श्वभूमीवर शेअर केले जात आहेत.

खाली दिलेल्या सर्व व्हिडिओंची सत्यता रिव्हर्स इमेजद्वारे सर्चद्वारे केलेली आहे.

व्हिडिओ क्र. 1

कॅप्शन – “हमासचा गाझा पट्टीवरुन इस्त्रायलवर हल्ला.”

मुळ पोस्ट – फेसबुक | फेसबुक | आर्काइव्ह

सत्य –

व्हायरल व्हिडिओ सध्याचा नसून पाच महिन्यांपूर्वीचा आहे.

द गार्डियन न्यूजच्या बातमीनुसार हा व्हिडिओ इस्रायलच्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा होता, 13 मे रोजी उत्तर गाझामधील घरावर इस्रायलने हवाई हल्ला केला होता. या हल्ल्यासाठी इस्रायलने 1000 क्षेपणास्त्रे डागले होते. मुळ व्हिडिओ आपण येथे पाहू शकातात.

व्हिडिओ क्र. 2

कॅप्शन - “इस्रायलने फिलिस्तीनींना धडा शिकविण्याचा निर्णय घेतला आहे. हमासने आज केलेल्या भीषण हल्ल्यामध्ये इस्रायलचे अनेक नागरिक जखमी झाले आहेत, मृत झाले आहेत.”

मुळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

सत्य –

व्हायरल व्हिडिओ सध्याचा नसून 2 वर्षांपूर्वीचा आहे.

अल जझीरा न्यूजच्या बातमीनुसार इस्रायल आणि हमास यांच्यातील वाढत्या संघर्षादरम्यान 13 मे 2021 रोजी गाझामधील 14 मजली अल-शोरौक टॉवरवर इस्रायलीने हा हवाई हल्ला केला होता. मूळ व्हिडिओ आपण येथे पाहू शकातात.

व्हिडिओ क्र. 3

कॅप्शन – इराणच्या संसदेत 'विरोधात इस्रायल आणि अमेरिका'च्या घोषणा देण्यात आल्या.

मुळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

सत्य –

व्हायरल व्हिडिओ सध्याचा नसून 3 वर्षांपूर्वीचा आहे.

सीएनएनच्या बातमीनुसार बगदादमध्ये अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात इराणचा लष्करी नेता कासिम सुलेमानी मारला गेला होता. या घटनेच्या निषेधार्थ 5 जानेवारी 2020 रोजी इराणच्या संसद सदस्यांनी 'डाऊन विथ अमेरिका'च्या घोषणा दिल्या होता. अधिक माहिती येथे पाहू शकतात.

व्हायरल फोटो खालील प्रमाणे आहेत.

फोटो क्र.1

कॅप्शन – “सीरिया अंडर अटॅक, आर्मी अकादमीमध्ये ड्रोन हल्ल्यानंतर सुमारे 100 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. लोक मदतीसाठी आणि आश्रयासाठी धावत आहेत.”

मूळ पोस्ट – ट्विटर

सत्य –

व्हायरल फोटो सध्याचा नसून 2 वर्षांपूर्वीचा आहे.

हिंदुस्तान टाइम्सच्या बातमीनुसार 31 जानेवारी 2021 रोजी सीरियामध्ये उत्तर अलेप्पो ग्रामीण भागातील दोन शहरांमध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटचा आहे. या वेळी सलग दोन बॉम्ब स्फोट झाले होते ज्यामध्ये 12 लोक मारले गेले आणि 29 इतर जखमी झाले होते. अधिक माहिती येथे पाहू शकतात.

फोटो क्र. 2

कॅप्शन – “इस्रायलमधील भयानक आणि हृदयद्रावक दृश्ये. मृत लोकांना ट्रकवर टाकून ट्रॉफीज जिंकल्यासारख परेड केली जात आहे, वृद्ध महिलांना बंधक म्हणून गाझामध्ये नेले आहे आणि इस्रायलमधील निरपराध नागरिकांवर 5,000 रॉकेटचा वर्षाव केला जात आहे.”

मुळ पोस्ट – फेसबुक

सत्य –

व्हायरल फोटो सध्याचा नसून 2014 सालचा आहे.

न्यूयॉर्क पोस्टच्या बातमीनुसार 29 जुलै 2014 रोजी पूर्व गाझा शहरात इस्रायलीने हा हवाई हल्ला होता. हा स्फोटामुळे गाझाच्या एकमेव वीज प्रकल्प उद्ध्वस्त झाला होता. ज्यामुळे गाझा पट्टीतील 17 दशलक्ष लोकांना वीज आणि पाणीपुरवठा खंडित झाला. तसेच या हल्ल्यात हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला. संबंधित सविस्तर माहिती येथे वाचू शकतात.

फोटो क्र. 3

कॅप्शन – एकतेचे प्रतिक म्हणून अझरबैजान देशाने आपल्या राजधानी बाकूमधील इमारतींवर इस्रायली झेंडा झळकविला आला.

मुळ पोस्ट – फेसबुक

सत्य –

व्हायरल फोटो सध्याचा नसून 2015 सालचा आहे.

अझरबैजानच्या कौन्सुलेट जनरल माहितीनुसार 18 जुन 2015 रोजी अझरबैजान मधील युरोपियन गेम्समध्ये टीम इस्रायलच्या सहभागाचा सन्मान करताना बाकू शहरातील फ्लेम टॉवर्सवर इस्रायली झेंडा दाखवण्यात आला होता. तो व्हिडिओ अपण येथे पाहू शकतात.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल होत असलेले व्हिडिओ आणि फोटो सध्याच्या इस्रायल आणि पॅलेस्टाई युद्धाचे नाहीत. भ्रमक दाव्यासह जुने आणि असंबंधित फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:हमास व इस्रायलमधील युद्धाचे दृष्य म्हणून जुने आणि असंबंधित फोटो/व्हिडिओ व्हायरल

Written By: Sagar Rawate

Result: Misleading