
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन आहे. त्यातच एक महामार्गावर बसलेल्या हरणांचे एक छायाचित्र सध्या समाजमाध्यमात पसरत आहे. हे छायाचित्र उटी कोइंम्बतुर महामार्गावरील असल्याचा दावा या छायाचित्रासोबत करण्यात येत आहे. हे छायाचित्र लॉकडाऊनच्या काळातील उटी कोइंम्बतुर महामार्गावरील आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

तथ्य पडताळणी
हे छायाचित्र उटी कोइंम्बतूर महामार्गावरील आहे का? हे जाणून घेण्यासाठी ते रिव्हर्स इमेज केले. त्यावेळी मिळालेल्या परिणामात हे छायाचित्र जुलै 2014 मधील जपानमधील नारा या शहरातील असल्याचा उल्लेख दिसून आला. अनेकांनी उन्हाळ्यात येथील वन्यजीव असे रस्त्याच्याकडेला पहुडलेले असतात, असा उल्लेख केलेला असल्याचेही दिसून आले. त्यानंतर जपान टूडे या संकेतस्थळावरील 28 जुलै 2014 रोजीचे एक वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार नारातील एका रस्त्याचा हरणांनी ताबा घेतला आहे.

जपान टूडेतील सविस्तर वृत्त / Archive
त्यानंतर युटुयुबवरील 17 जुलै 2014 रोजीचा एक व्हिडिओ दिसून आला. या व्हिडिओखाली इंग्रजीत म्हटले आहे की, 2014 तील उन्हाळ्यात नारा शहरातील रस्ते व्याप्त करत असलेली हरणे. या व्हिडिओ दृश्यावरुन हे स्पष्ट झाले की, हरणांचे हे कळप नारो शहरातीलच आहेत.
दरवर्षी उन्हाळ्यात नारो शहरात अशा प्रकारे हरणे फिरतात का? याचाही शोध घेतला असता 2013 मधील असाच एक व्हिडिओ दिसून आला. त्यानंतर Amazing Oasis या फेसबुक पेजवर 26 जानेवारी 2018 रोजी पोस्ट करण्यात आलेले एक छायाचित्रही दिसून आले. हे तेच छायाचित्र आहे जे सध्या समाजमाध्यमात उटी कोइंम्बतूर महामार्गावरील म्हणून पसरत आहे. यात आपल्याला जपानी भाषेतील फलकही स्पष्ट दिसत आहे.
समाजमाध्यमात भारतातील म्हणून फिरत असलेल्या छायाचित्राची आणि मूळ छायाचित्राची खाली तुलना केली आहे.

निष्कर्ष
समाजमाध्यमात लॉकडाऊननंतरचे उटी कोइंम्बतूर महामार्गावरील म्हणून पसरत असलेले छायाचित्र जपानमधील आहे. ते भारतातील असल्याचा दावा असत्य आहे.

Title:उटी कोइंम्बतुर महामार्गावरील लॉकडाऊननंतरचे हे छायाचित्र नाही; वाचा सत्य
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
