राहुल गांधी यांनी ‘मुख्यमंत्री भूपेश बघेल अदानीसाठी काम करतात’ असे म्हटले नव्हते; वाचा सत्य
देशात मिझोरम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या पाच राज्यात विधानसभा निवडणूका पार पडणार आहेत. नुकतेच काँग्रेस नेते राहुल गांधी आगामी निवडणुकांच्या निमित्ताने छत्तीसगडच्या दौऱ्यावर गेले होते.
या पार्श्वभूमीवर त्यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये राहुल गांधी म्हणातात की, “तुमचे मुख्यमंत्री अदानीसाठी काम करतात,” दावा केला जात आहे की, राहुल गांधींनी आपल्याच पक्षाचे नेते आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासाठी हे वक्तव्य केले होते.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट आहे. राहुल गांधी यांनी “मुख्यमंत्री अदानीसाठी काम करतात” हे वक्तव्य भूपेश बघेल यांना उद्देशून म्हटले नव्हते.
काय आहे दावा ?
हा व्हिडिओ शेअर करताना युजर्स कॅप्शनमध्ये लिहितात की,
"या राज्याचे मुख्यमंत्री अदानींसाठी काम करतात - राहुल गांधी." “ते छत्तीसगडमध्ये एका सभेला संबोधित करत होते आणि काँग्रेसचे भूपेश बघेल हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
कीवर्ड सर्च केल्यावर कळाले की, 29 ऑक्टोबर रोजी राहुल गांधींनी हे भाषण छत्तीसगडमधील राजनांदगावत हे भाषण केले होते.
वन इंडिया हिंदी या युट्यूब चॅनलने या भाषणाचे थेट प्रक्षेपण केले होते.
संपूर्ण भाषण पाहिल्यानंतर लक्षात येते की, राहुल गांधी यांनी “छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे अदानीसाठी काम करतात” असे कुठेही म्हटले नाही.
उलट या ठिकाणी भाजप सरकार आणि आदाणीवर टीका करताना राहुल गांधी म्हणतात की, “नरेंद्र मोदींच्या सरकारने अदानींचे 14 लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे. भाजपने आतापर्यंत कोणत्या राज्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे ? असे एकही राज्य सापडणार नाही. केंद्र सरकारचा अदानीशी थेट संबंध आहे, अदानींना खाणी, विमानतळ, बंदरे दिली आणि शेतकऱ्यांसाठी कायदे केले. शेतकऱ्याला काही समज नाही, असे त्यांना (भाजप) वाटते. शेतकऱ्यांच्या खिशातून पैसे हिसकाउन अदानीला देण्यासाठी भाजपने कायदा आणलात होता. आणि तुम्ही (भाजप) अदानीजींना 24 तास मदत करत राहता आणि तुमचा (भाजपचा) मुख्यमंत्रीही अदानीजींसाठी काम करतो. आम्ही (काँग्रेस) शेतकरी, मजूर, छोटे व्यापारी आणि तरुणांसाठी काम करतो, हा फरक आहे.”
तसेच व्हायरल व्हिडिओमध्ये राहुल गांधी जे काही बोलतात त्याआधी ते भाजप आणि पंतप्रधान मोदींबद्दल बोलत होते. जेव्हा ते म्हणतात की, मुख्यमंत्रीही अदानींसाठी काम करतात, तेव्हा त्यांचा अर्थ भाजपचा मुख्यमंत्री असा होतो. ते भूपेश बघेल यांना उद्देशून बोलत नव्हते.
खालील तुलनात्मक व्हिडिओ पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, मूळ व्हिडिओला एडिट करून अर्धवट वाक्य पसरविले जात आहे.
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट आहे. राहुल गांधी यांनी “मुख्यमंत्री अदानीसाठी काम करतात” हे वक्तव्य काँग्रेस नेते आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना उद्देशून केले नव्हते. ते भाजप सरकारबद्दल बोलत होते. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)
.hocal_container_hocal {
border: 2px solid #000;
background-color: #eee;
border-radius: 5px;
padding: 16px;
margin: 16px 0
}
.hocal_container_hocal::after {
content: "";
clear: both;
display: table;
}
.hocal_container_hocal img {
float: left;
margin-right: 20px;
border-radius: 50%;
}
.hocal_container_hocal span {
font-size: 20px;
margin-right: 15px;
}
@media (max-width: 500px) {
.hocal_container_hocal {
text-align: center;
}
.hocal_container_hocal img {
margin: auto;
float: none;
display: block;
}
}
Title:राहुल गांधी यांनी ‘मुख्यमंत्री भूपेश बघेल अदानीसाठी काम करतात’ असे म्हटले नव्हते; वाचा सत्य
Written By: Sagar Rawate
Result: False