मुंबई पोलिसांच्या नावाने पसरविण्यात येणारी ही पोस्ट किती सत्य?

False सामाजिक
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

*महाराष्ट्र शासन*  *IMPORTANT NOTICE* सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, जर आपल्या घरी कोणही आले आणि म्हणाले, “आम्ही सरकारी माणसं आहोत. आम्हाला तुमच्या *घराचे पेपर, सात बारा, लाईट बिल, सात बारा इंडेक्स कॉपी, रेशनकार्ड, आधारकार्ड* मागितलं तर देऊ नये. कारण हे लोक चोर आहेत. ते तुम्हाला सांगतील, “आम्ही तुम्हाला टैक्स पावती चालू करून देऊ.” असे सांगून तुमचे *लाईट मीटरचे फोटो, बोटांचे ठसे* घेतील. आणि हे सगळं घेऊन पसार होतील. *नोट :* तीन किंवा चार जण येतील. त्यात मुली सुद्धा आहेत. सतर्क रहा. पुढे पाठवा..

*अविनाश झोडगे*
(मुंबई पोलिस)

अशी एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

फेसबुक / Archive

तथ्य पडताळणी

मुंबई पोलिसांनी आणि महाराष्ट्र शासनाने खरंच अशी काय सुचना जारी केली आहे का? याची माहिती घेण्यासाठी आम्ही महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळास भेट दिली. त्याठिकाणी आम्हाला अशी कोणतीही माहिती आढळून आली नाही.

महाराष्ट्र शासनाचे संकेतस्थळ / Archive

त्यानंतर मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळास आम्ही भेट दिली. त्याठिकाणीही आम्हाला अशी कोणतीही सुचना दिसून आली नाही. मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळावर सेफ्टी टिप्स नावाचा एक स्वतंत्र विभाग असून यात कोणती बाब करताना काय काळजी घ्यावी याची माहिती देण्यात आली आहे. याठिकाणीही असा कोणताही संदेश दिसत नाही.

महाराष्ट्र पोलिसांच्या संकेतस्थळावर मराठीत विविध माहिती उपलब्ध असून या ठिकाणीही अशी कोणतीही माहिती आढळत नाही.

महाराष्ट्र पोलिसांचे संकेतस्थळ / Archive

मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळावर विविध पोलिस अधिकाऱ्यांची नावे आणि त्यांचे मोबाईल क्रमांक उपलब्ध असून यात कुठेही अविनाश झोडगे या अधिकाऱ्याचे नाव आढळून येत नाही.

Senior-Officers

निष्कर्ष

मुंबईतील नागरिकांची कागदपत्रे खोटे बोलून घेणारी एक टोळी कार्यरत असून त्यापासून सावध राहा, असा कोणताही संदेश मुंबई पोलिसांनी जारी केलेला नाही. अविनाश झोडगे नावाचे अधिकारीही मुंबई पोलिस दलात कार्यरत असल्याचे आढळून येत नाही. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.  

Avatar

Title: मुंबई पोलिसांच्या नावाने पसरविण्यात येणारी ही पोस्ट किती सत्य?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •