Fact Check : हे खरोखरच तुळशीचे मोठे झाड आहे का?

False सामाजिक

तुळशीचे झाड एवढे मोठे ? म्हणून Khadpekar Ravindra यांनी आरडी. अमरुते यांची एक पोस्ट शेअर केली आहे. तुळशीचे झाड म्हणून या पोस्टमध्ये एक फोटो वापरण्यात आला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने हे झाड नक्की तुळशीचे मोठे झाड आहे का? याची तथ्य पडताळणी केली आहे. खाली आम्ही मुळ पोस्टचा स्क्रीनशॉट आणि लिंक दिली आहे.  

फेसबुक / Archive

तथ्य पडताळणी

तुळशीचे सगळ्यात मोठे झाड कोठे आहे, हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यावेळी आम्हाला अशा स्वरुपाचे कोणतेही वृत्त दिसून आले नाही. त्यानंतर आम्ही रिव्हर्स इमेज सर्चद्वारे याचा शोध घेतला. त्यावेळी हा वृक्ष म्हणजे River birch असल्याचे दिसून आले. arborday.org या संकेतस्थळावर या वृक्षाबद्दल अधिक माहिती देण्यात आली आहे. 

या दोन्ही वनस्पतींची तुलना आपण खाली पाहू शकता. 

दैनिक लोकसत्ताने तुळशीच्या विविध प्रकारची माहिती दिली असून या माहितीतही अशा प्रकारची तुळस दिसून येत नाही. दैनिक लोकसत्ताने झाडाझुडपांविषयी दिलेल्या झाडाझुडपांच्या देशा या लेखात विविध वृक्षांची माहिती दिलेली आहे. यातही या वृक्षाचा उल्लेख दिसून येत नाही. जागतिक विक्रमांची नोंद करणाऱ्या गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या संकेतस्थळावरही आम्ही जगातील सगळ्यात मोठया तुळशीच्या झाडाची काही नोंद दिसते का हे तपासले त्यावेळी आम्हाला खालील माहिती दिसून आली.

गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड / Archive

निष्कर्ष

हे तुळशीचे मोठे झाड नसून अन्य वृक्ष आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हे तुळशीचे मोठे झाड असल्याचा दावा असत्य आढळून आला आहे.

Avatar

Title:Fact Check : हे खरोखरच तुळशीचे मोठे झाड आहे का?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False