वाशी पोलिसांच्या नावाने कोरोनाबाबत व्हायरल होत असलेला मेसेज खोटा

False वैद्यकीय सामाजिक
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

नवी मुंबई, वाशी, जुहूगाव सेक्टर 11 येथे बॉयलर चिकनमध्ये कोरोना व्हायरस सापडला आहे. तरी सर्वांना सूचित करण्यात येते की, बॉयलर चिकन खाऊ नये.
(वाशी पोलिस स्टेशन.), असा संदेश सध्या समाजमाध्यमात वेगाने पसरत आहे. वाशी पोलिसांनी खरोखरच असा संदेश पाठवला आहे का,  नवी मुंबई, वाशी, जुहूगाव सेक्टर 11 येथे बॉयलर चिकनमध्ये कोरोना व्हायरस सापडला आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

Archive

तथ्य पडताळणी

नवी मुंबई, वाशी, जुहूगाव सेक्टर 11 येथे बॉयलर चिकनमध्ये कोरोना व्हायरस सापडल्याचा संदेश खरा आहे का, हे जाणून घेण्यासाठी आम्ही याबाबतच्या माहितीची शोध घेतला. त्यावेळी आम्हाला युटूयूबवर 12 फेब्रुवारी 2020 रोजीचा खालील व्हिडिओ दिसून आला. या व्हिडिओखाली देण्यात आलेल्या माहितीत नवी मुंबई, वाशी, जुहूगाव सेक्टर 11 येथे बॉयलर चिकनमध्ये कोरोना व्हायरस सापडले असल्याचे म्हटले आहे.

Archive

त्यानंतर आम्ही नवी मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळास भेट देत याठिकाणी याबाबत काही माहिती मिळते का, हे शोधण्याचा प्रयत्न केला. याठिकाणी अशी कोणतीही माहिती दिसून आली नाही. त्यानंतर आम्ही वाशी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजीव धुमाळ यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, नवी मुंबई, वाशी, जुहूगाव सेक्टर 11 येथे बॉयलर चिकनमध्ये कोरोना व्हायरस सापडल्याचा संदेश खोटा आहे. यावर कोणीही विश्वास ठेवू नये. वाशी पोलिस ठाण्याने असा कोणताही संदेश नागरिकांना पाठवलेला नाही. 

vashi Police Station.png

निष्कर्ष

नवी मुंबई, वाशी, जुहूगाव सेक्टर 11 येथे बॉयलर चिकनमध्ये कोरोना व्हायरस सापडल्याचा कोणताही संदेश वाशी पोलिसांनी नागरिकांना पाठवलेला नाही.  

Avatar

Title:वाशी पोलिसांच्या नावाने कोरोनाबाबत व्हायरल होत असलेला मेसेज खोटा

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •