मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलामध्ये नोकर भरतीचा फेक मेसेज व्हायरल; वाचा सत्य 

False Government

मुंबई अग्निशमन दलामध्ये बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकर भरती सुरू झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुंबई अग्निशमन दलामध्ये 774 अग्निशामकांची सरळ सेवा पद्धतीने भरती करण्यात येणार असल्याचे या मेसेजमध्ये म्हटल आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या  व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून त्याच्या सत्यतेबाबत विचारणा केली.

आमच्या पडताळणीत हा मेसेज चुकीचा आढळला. मुंबई अग्निशमन दलामध्ये नोकरभरतीच्या मेसेजवर विश्वास ठेवू नये.

काय आहे मेसेजमध्ये?

मेसेजमध्ये म्हटले आहे की, 19 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरदरम्यान मुंबई अग्निशमन दलातील 774 पदांवर सरळ सेवा पद्धतीने भरती होणार आहे. यापैकी अनुसूचित जाती (98 पदे), अनुसूचित जमाती (61 पदे), विमुक्त जाती – अ (21 पदे), भटक्या जमाती – ब (12 पदे), भटक्या जमाती – क (26 पदे), भटक्या जमाती – ड (14 पदे), इतर मागासवर्गीय (170 पदे), विशेष मागास प्रवर्ग (13 पदे) आणि खुल्या प्रवर्गासाठी (358 पदे) राखीव आहेत. बारावी उत्तीर्ण उमेदवार या पदासाठी अर्ज करण्यास पात्र असल्याचे या मेसेजमध्ये म्हटले आहे.

मूळ पोस्ट – फेसबुकफेसबुक 

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम या भरतीची अधिकृत जाहिरात शोधली. परंतु, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई अग्निशमन दलाच्या वेबसाईटवर सदरील 774 पदांच्या भरतीचे नोटिफिकेशन सापडले नाही. तसेच, 19 ऑगस्टपासून भरती सुरू होईल अशी बातमीसुद्धा कुठे आठळली नाही. त्यामुळे याविषयी शंका बळावली.

कीवर्ड सर्च केल्यावर लोकसत्ताची बातमी आढळली. गेल्या महिन्यात हा मेसेज व्हायरल झाल्यानंतर हजारो तरुणांनी मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाकडे याविषयी विचारणी केली. त्यावेळी स्पष्ट करण्यात आले की, अशी कोणतीही भरती होणार नाही. सदरील मेसेज फेक आहे.

फॅक्ट क्रेसेंडो मराठीने मुंबई महानगरपालिकच्या जनसंपर्क अधिकाऱ्याशी संपर्क साधला. त्यांनी सदरील मेसेज भ्रामक आणि चुकीचा असल्याचे सांगितले. अग्निशमन दलामध्ये व्हायरल मेसेजप्रमाणे सांगितल्याप्रमाणे भरती सुरू झाली नाही.

अधिकृत भरती कधी?

सकाळच्या बातमीनुसार, मुंबई अग्निशमन दलामध्ये थेट मुलाखतीने 902 जणांची मेगाभरती करण्याच्या प्रस्तावाला महापालिका आयुक्तांची मंजुरी मिळाली आहे. मुंबई अग्निशमन दलात 2017 मध्ये 750 कर्मचाऱ्यांची शेवटची भरती झाली होती. त्यानंतर गेल्या पाच वर्षात एकाही कर्मचाऱ्याची नव्याने भरती झाली नाही.

मुख्य अग्निशमन अधिकारी हेमंत परब माहिती दिली की, मुंबई अग्निशमन दलामध्ये सर्वात मोठी भरती प्रक्रिया प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे; मात्र त्यात काही सुधारणा सुचवण्यात आल्या आहेत. त्यानुसार आवश्यक ते बदल करण्यात आले असून पुढील महिन्याभरात भरतीचा मार्ग मोकळा होईल.

निष्कर्ष

मुंबई अग्निशमन दलामध्ये 19 ऑगस्टपासून 774 पदांची भरती सुरू होण्याबाबत व्हायरल झालेला मेसेज खोटा आहे. अशी भरती होणार नसून, चुकीचा मेसेजवर विश्वास ठेवू नये.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलामध्ये नोकर भरतीचा फेक मेसेज व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False