सुप्रसिध्द वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे निधन झाल्याचे वृत्त खोटे; वाचा सत्य

False सामाजिक

सुप्रसिध्द वृत्तनिवेदक आणि सुत्रसंचालक प्रदीप भिडे यांचे निधन झाल्याची माहिती सध्या समाजमाध्यमात पसरत आहे. प्रदीप भिडे यांच्या निधनाची ही माहिती सत्य आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

screenshot-www.facebook.com-2020.07.17-16_15_12.png

फेसबुक पोस्ट / संग्रहित

तथ्य पडताळणी

सुप्रसिध्द वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांच्या निधनाचे वृत्त खरे आहे का? हे जाणून घेण्यासाठी शोध घेतला. त्यावेळी त्यांची पुतणी वैभवी भिडे यांनी हे वृत्त असत्य असल्याचे आणि असे वृत्त देणाऱ्या संकेतस्थळाने दिलगिरी व्यक्त केल्याचे म्हटले असल्याचे दिसून आले. 

संग्रहित

शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. मनिषा कायंदे यांनीही त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून 15 जुलै 2016 रोजी याबाबत केलेले एक ट्विट दिसून आले. त्यानुसार प्रदीप भिडे हे सुखरूप असून आपल्या घरीच आहेत. हे ट्विट आपण खाली पाहू शकता. 

संग्रहित

निष्कर्ष

यातून हे स्पष्ट झाले की, प्रदीप भिडे यांच्या निधनाचे माहिती असत्य आहे. ते आपल्या घरी सुखरूप असल्याचे त्यांच्या कुटूंबियांनी स्पष्ट केले आहे.

Avatar

Title:सुप्रसिध्द वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे निधन झाल्याचे वृत्त खोटे; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False