ऋषी सुनक यांनी मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधान हवेत असे म्हटलेले नाही; वाचा सत्य

False राजकीय | Political

इंग्लंडचे नवे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी भारताविषयी केलेले एक कथित विधान व्हायरल होत आहे. सोशल मीडियावरील पोस्टला खरे मानले तर सुनक यांनी मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधान असायला हवेत असे म्हटले आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. 

पडताळणीअंती कळाले की, सुनक यांच्या नावाने खोटे विधान शेअर केले जात आहे. सुनक असे काही म्हटलेले नाही. 

काय आहे दावा?

ऋषी सुनक आणि मनमोहन सिंग यांचा फोटो असणारे ग्राफिक शेअर करून सोबत म्हटले की, भारताच्या बिघडत चाललेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मनमोहन सिंह सारख्या पंतप्रधानांची आवश्यकता आहे – ऋषी सुनक (ब्रिटनचे पंतप्रधान)

मूळ पोस्ट – इन्स्टाग्राम

तथ्य पडताळणी

ऋषी सुनक यांनी जर खरंच असे काही विधान केलेल असते तर मोठी बातमी ठरली असती. जगभरातील आणि विशेषतः भारतीय मीडियाने तर नक्कीच या विधानाची दखल घेतली बातमी प्रसिद्ध केली असती. परंतु, कोणत्याही भाषेतील वृत्तमाध्यमाने याविषयी बातमी केल्याची आढळले नाही. 

सुनक यांच्या सोशल मीडिया अकाउंट्वरसुद्धा अशा स्वरूपाचे विधान सापडले नाही. 

कीवर्ड सर्च केल्यानंतर राजद पक्षाचे नेते ईजया यादव यांनीसुद्धा सुनक यांचे हेच कथित विधान शेअर केले होते. फरक फक्त एवढाच आहे की, त्यांच्या ग्राफीकमध्ये ‘दैनिक भास्कर’चा लोगो आहे.

मूळ पोस्ट – ट्विटरअर्काइव्ह

हा धागा पकडून मग आम्ही दैनिक भास्करच्या सोशल मीडियावर या ग्राफिकचा शोध घेतला. दैनिक भास्करच्या ट्विटर अकाउंटवर 25 ऑक्टोबर रोजी सुनक व सिंग यांचा फोटो असणारे हेच ग्राफिक शेअर करण्यात आले होते. परंतु, या पोस्टरमध्ये विधान मात्र वेगळेच होते. 

दैनिक भास्करच्या मूळ पोस्टरमध्ये लिहिलेले आहे की, “चिदंबरम-थरूर की सलाह, भारत में भी हो अल्पसंख्यक PM: भाजपा बोली – मनमोहन सिंह को भूल गए”

मूळ पोस्ट – ट्विटरअर्काइव्ह

सुनक इंग्लंडचे पहिले भारतीय वंशाचे पंतप्रधान झाल्यानंतर काँग्रेस नेते पी. चिदंबरम आणि शशी थरूर यांनी भारतातसुद्धा अल्पसंख्यांक समुदायातून पंतप्रधान व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती. याला उत्तर देताना भाजप नेत्यांनी त्यांना आठवण करून दिली होती की, डॉ. मनमोहन सिंग हे अल्पसंख्यांक शीख समुदयातून आलेले पंतप्रधान होते. 

व्हायरल पोस्टर आणि दैनिक भास्करचे मूळ ग्राफिक यांची तुलना केल्यावर दोन्हींमधील फरक लगेच लक्षात येईल.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, सुनक यांनी मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधान असायला हवेत असे म्हटलेले नाही. दैनिक भास्करचे ग्राफिक चुकीच्या विधानासह व्हायरल केले जात आहे.

 (तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:ऋषी सुनक यांनी मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधान हवेत असे म्हटलेले नाही; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False