महाराष्ट्र राज्याचा बारावीच्या परीक्षेचा निकाल 15 जुलैला असल्याची अफवा; वाचा सत्य

False सामाजिक

महाराष्ट्र राज्याच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल 15 जुलै 2020 रोजी असल्याचा माहिती सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल खरोखरच 15 जुलै 2020 रोजी आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

फेसबुक पोस्ट / संग्रहित

तथ्य पडताळणी 

महाराष्ट्र राज्याचा बारावीचा परीक्षेचा निकाल 15 जुलै 2020 रोजी लागणार आहे का? याचा शोध घेतला. त्यावेळी एबीपी माझा या वृत्तवाहिनीने 13 जुलै 2020 रोजी दिलेले एक वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी बारावीचा निकाल 15 ते 20 जुलै तर दहावीचा निकाल 31 जुलैपर्यंत लागणार असल्याचे म्हटले आहे. यातून हे स्पष्ट झाले की, त्यांनी कोणतीही निश्चित तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.

screenshot-marathi.abplive.com-2020.07.14-15_33_14.png

एबीपी माझाचे वृत्त / संग्रहित

सीबीएसईचा निकाल अचानक जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल 15 जुलै 2020 रोजी असल्याचे वृत्त पसरले. त्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बोर्डाच्या मुख्य कार्यालयाकडून अर्थात पुणे येथून रितसर पत्रकार परिषद घेऊन किंवा परिपत्रक जारी करून निकालाची तारीख आधी कळवली जाते.  मंडळाने बारावीच्या परीक्षेच्या निकालाची अधिकृत तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. तारीख निश्चित झाली, की त्याची माहिती अधिकृत जाहीर केली जाईल. त्यानंतरच निकाल जाहीर होईल, असे स्पष्टीकरण दिल्याचे वृत्त महाराष्ट्र टाईम्सने 14 जुलै 2020 रोजी दिले असल्याचे दिसून आले ते आपण खाली पाहू शकता. 

screenshot-maharashtratimes.com-2020.07.14-15_51_13.png

महाराष्ट्र टाईम्स / संग्रहित

यातून हे स्पष्ट झाले की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या निकालाची कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही. निकालाची तारीख ही एक ते दोन दिवस आधी जाहीर करण्यात येणार असल्याचेही मंडळाने म्हटलेले आहे. 

निष्कर्ष

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल 15 जुलै 2020 रोजी जाहीर करणार असल्याचे असत्य आहे.

Avatar

Title:महाराष्ट्र राज्याचा बारावीच्या परीक्षेचा निकाल 15 जुलैला असल्याची अफवा; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False