जयपूर येथील टोळधाडीचा व्हिडियो महाराष्ट्रातील म्हणून व्हायरल; वाचा सत्य

False सामाजिक

महाराष्ट्रात टोळधाड आल्याचा म्हणून सध्या एक व्हिडियो व्हायरल होत आहे. नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा आणि मोर्शी या गावांतील हा व्हिडियो असल्याचा दावा केला जात आहे. हा व्हिडियो महाराष्ट्रातील आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली असता हा व्हिडियो जयपूरमधील असल्याचे समोर आले

फेसबुक पोस्ट / संग्रहित

तथ्य पडताळणी 

व्हिडियोतील की-फ्रेमला रिव्हर्स इमेज सरच केले असता द टाईम्स ऑफ इंडियाच्या युटुयूब चॅनलवरील 26 मे 2020 रोजीचा एक व्हिडियो आढळला. यानुसार हा व्हिडियो जयपूर शहरातील असल्याचे म्हटले आहे. पश्चिम राजस्थानमधून आलेल्या या टोळधाडीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचेही या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. 

संग्रहित

नवभारत टाईम्स या हिंदी वृत्तपत्राच्या युटूयूब चॅनलवरही 27 मे 2020 रोजी हाच व्हिडियो अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडियोखाली देण्यात आलेल्या माहितीतही ही जयपूर येथील घटना असल्याचे म्हटले आहे.  

संग्रहित

इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राच्या संकेतस्थळानेही 27 मे 2020 रोजी याबाबतचे सविस्तर वृत्त प्रकाशित केले असल्याचे दिसून आले.

image3.png

इंडियन एक्सप्रेस / संग्रहित

निष्कर्ष

यातून हे स्पष्ट झाले की, टोळधाडीचा हा व्हिडियो राजस्थानमधील जयपूर येथील असून महाराष्ट्रातील नाही.

Avatar

Title:जयपूर येथील टोळधाडीचा व्हिडियो महाराष्ट्रातील म्हणून व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False