Fact Check : हा लंडनमध्ये साजरा करण्यात आलेल्या स्वातंत्र्य दिनाचा व्हिडिओ नाही

False आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

ट्रॅफलगार स्व्केअर, लंडन इथे साजरा झालेला स्वातंत्र्य दिन, अशी माहिती Shailaja Pandit यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. PCBToday.in नेही अशी पोस्ट टाकाली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

फेसबुक / Archive

तथ्य पडताळणी  

हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही या व्हिडिओतील इमारतीचा स्क्रीनशॉट घेत त्याला रिव्हर्स इमेज सर्च केले. याद्वारे मिळालेल्या परिणामातून या इमारतीचे नाव व्हिटोरिओ इमॅन्युले II स्मारक असल्याने दिसून आले. याला इंग्रजीत “Altar of the Fatherland” असे म्हणतात. या माहितीतुन हे देखील स्पष्ट झाले की हे स्मारक इटलीतील रोम शहरात आहे. इंग्लंडमधील लंडन या शहरात नाही.

गुगल मॅप वर याची छायाचित्रे शोधल्यावर दिसून येते की, या स्मारकासमोर इटलीचा राष्ट्रध्वज आहे.

खाली आपण भारत आणि इटलीच्या ध्वजामधील फरक व साम्य पाहू शकता.

त्यानंतर आम्ही इटलीचा राष्ट्रीय दिवस आणि प्रजासत्ताक दिन कधी असतो याचा शोध घेतला. त्यावेळी इटलीचा राष्ट्रीय दिवस आणि प्रजासत्ताक दिन 2 जून रोजी असल्याचे स्पष्ट झाले. या दिवशी इटलीच्या झेंड्यातील तिन्ही रंग हवाई कसरतीद्वारे सादर करण्यात येतात. इटली हवाई दलाचा एक विशेष विभाग प्रजासत्ताक दिनी एका विशेष समारंभात या हवाई कसरती सादर करते.

Embed from Getty Images

इटलीच्या प्रजासत्ताक दिनाविषयी माहिती घेण्यासाठी आम्ही इंग्रजीत Italy celebrates Republic Day असा शब्दप्रयोग करत शोध घेतला. त्यावेळी युरो न्यूज या वृत्तवाहिनीचा खालील व्हिडिओ आम्हाला दिसून आला.

‘इटली रिपब्लिक डे’ असा शब्दप्रयोग करत फेसबुकवर शोधल्यावर आम्हाला 4 जून 2019 रोजी मस्ट डू ट्रॅव्हलद्वारे प्रसिध्द करण्यात आलेला एक व्हिडिओ दिसून आला.

त्यानंतर आम्ही इंग्लंडमधील लंडन शहरातील ट्राफलगर स्क्वेअर नेमका कसा दिसतो हे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ट्राफलगर स्क्वेअरची रचना पुर्णत: भिन्न असल्याचे दिसून आले. यातून हे सिध्द झाले की, हा लंडनमधील ट्राफलगर स्क्वेअर नाही.

निष्कर्ष 

भारतीय स्वातंत्र्य दिनाचा म्हणून प्रसारित करण्यात येणारा हा व्हिडिओ भारतीय स्वातंत्र्य दिनाचा नव्हे तर इटलीच्या प्रजासत्ताक दिनाचा आहे. इटली रोम येथे तो साजरा करण्यात आला होता. लंडनमधील ट्राफलगर स्क्वेअर हे ठिकाणही यापेक्षा भिन्न आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:Fact Check : हा लंडनमध्ये साजरा करण्यात आलेल्या स्वातंत्र्य दिनाचा व्हिडिओ नाही

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •