Fact Check : या छायाचित्रातील व्यक्ती दिलीपकुमारच आहे का?

False सामाजिक

सुप्रसिध्द अभिनेते दिलीपकुमार यांचे म्हणून समाजमाध्यमात एक छायाचित्र व्हायरल होत आहे. या छायाचित्रासोबत लिहिले आहे की, तुम्ही विश्वास ठेवू शकता हे दिलीपकुमार आहेत. दिलीपकुमार यांच्या चाहत्यांमध्येही या छायाचित्राविषयी उत्सुकता दिसून येते. धनराज राठी यांनीही हे छायाचित्र पोस्ट केले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  

screenshot-www.facebook.com-2019.12.27-18_05_08.png

फेसबुकवरील मुळ पोस्ट

तथ्य पडताळणी

या छायाचित्रातील व्यक्ती अभिनेते दिलीपकुमारच आहे का, याची माहिती घेण्यासाठी आम्ही हे छायाचित्र सर्वप्रथम रिव्हर्स इमेज केले.     त्यावेळी आम्हाला याचा जो परिणाम प्राप्त झाला त्यात रिपब्लिकन वर्ल्ड या संकेतस्थळावरील एक वृत्त दिसून आले. या वृत्तात अभिनेते दिलीप कुमार यांना वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसकडून सन्मानित करण्यात आले असल्याचे म्हटले आहे. सायरा बानू यांनी हा पुरस्कार स्वीकारल्याचे या वृत्तात म्हटले आहे. 

image2.png

रिपब्लिकन वर्ल्ड या संकेतस्थळावरील सविस्तर वृत्त / Archive

त्यानंतर आम्हाला इंडिया टुडेच्या संकेतस्थळावरील वृत्त दिसून आले. या वृत्तात दिलीपकुमार यांच्यासारखी दिसणारी ही व्यक्ती म्हणजे त्यांचे भाऊ अस्लम खान असल्याचे म्हटले आहे. 

image4.png

इंडिया टुडेमधील सविस्तर वृत्त / Archive

अभिनेते दिलीपकुमार यांनी स्वत: देखील याविषयी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरुन माहिती दिल्याचे आपण खाली पाहू शकता. 

https://twitter.com/TheDilipKumar/status/1206982977818787840

Archive

निष्कर्ष 

छायाचित्रात दिसणारी व्यक्ती ही अभिनेते दिलीपकुमार नसून ते त्यांचे बंधू अस्लम खान आहेत. स्वत: अभिनेते दिलीपकुमार यांनी याबाबतची माहिती त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरुन दिली आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:Fact Check : या छायाचित्रातील व्यक्ती दिलीपकुमारच आहे का?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False