नील आर्मस्ट्राँग यांनी धर्मांतर केले होते का? वाचा सत्य

False सामाजिक
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

चंद्रावर पहिले पाऊल ठेवण्यापूर्वी नील आर्मस्ट्राँग यांनी बौध्द धर्म स्वीकारला होता, माध्यमांनी आणि अमेरिकेने ही माहिती लपवली. अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी याबाबतचे एक छायाचित्र ट्विट केले आहे, अशा माहितीसह वैभव पुरोगामे यांनी अशा माहितीसह एक छायाचित्र पोस्ट केले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

Nil Armstrong claim.png

फेसबुकवरील मुळ पोस्ट

तथ्य पडताळणी

नील आर्मस्ट्राँग यांनी खरोखरच धर्मांतर केले होते का आणि बराक ओबामा यांनी याबाबत ट्विट केले होते का, हे जाणून घेण्यासाठी आम्ही बराक ओबामा यांच्या ट्विटर खात्यास भेट दिली. त्यावेळी बराक ओबामा यांनी 26 ऑगस्ट 2012 रोजी 

केलेले खालील ट्विट आम्हाला दिसून आले. या ट्विटमध्ये त्यांनी कोणतेही छायाचित्र त्यांनी ट्विट केलेले नाही.

Archive

त्यानंतर आम्ही तपास पुढे नेत हे छायाचित्र रिव्हर्स इमेज केले. त्यावेळी आम्हाला बीबीसीने अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाच्या सौजन्याने प्रसिध्द केलेले एक छायाचित्र दिसून आले. या छायाचित्र फक्त अमेरिकेचा ध्वज असल्याचे आपण स्पष्ट पाहू शकतो. हे छायाचित्र मानवाने पहिल्यादा चंद्रावर पाऊल ठेवले त्या अपोलो 11 मोहिमेत 20 जुलै 1969 रोजी घेण्यात आलेले आहे. या छायाचित्राच्या खाली दिलेल्या ओळीत म्हटले आहे की, अ‍ॅल्ड्रिन आणि आर्मस्ट्राँग यांनी चंद्राच्या पृष्ठभागावर अमेरिकेचा ध्वज उभारला आणि अ‍ॅल्ड्रिन यांनी त्याला सलाम केला. ध्वजस्तंभ योग्य रितीने उभा करता नसल्याने ध्वजाचा वरचा भाग काहीसा दुमडल्यासारखा दिसत आहे.

screenshot-www.bbc.com-2020.02.24-16_07_04.png

बीबीसीवरील मुळ वृत्त / Archive 

या छायाचित्राखालील माहितीतुन हे दिसून आले की छायाचित्रात दिसणारी व्यक्ती ही नील आर्मस्ट्रॉग नसून त्याचे सहकारी दुसरे अंतराळवीर अ‍ॅल्ड्रिन हे आहेत. नासाच्या मुळ छायाचित्राची आणि समाजमाध्यमात पसरत असलेल्या फेक छायाचित्राची आम्ही खाली तुलना केली आहे.

2020-02-24.jpg

हे छायाचित्र बनावट असल्याचे आणि बराक ओबामा यांनी असे कोणतेही ट्विट केले नसल्याचे सिध्द झाले. त्यानंतर आम्हाला बीबीसी मराठीने 19 जुलै 2019 रोजी दिलेले एक वृत्त दिसून आले. या वृत्तात कुठेही नील यांनी धर्मांतर केल्याचा उल्लेख आढळत नाही. अमेरिका सरकारने नील आर्मस्ट्राँग यांच्याबद्दल धर्मांतराच्या अफवा पसरत असल्याने 1983 साली एक निवेदन प्रसिध्द केले असल्याचे आम्हाला दिसून आले. द वॉशिग्टन पोस्टने याबाबतचे वृत्त प्रसिध्द केले होते. 

islam.net.png

द वॉशिग्टन पोस्टचे वृत्त / Archive wikiislam.net / Archive 

निष्कर्ष

अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग यांनी धर्मांतर केलेले नव्हते. अमेरिका सरकारने ही बाब वेळोवेळी स्पष्ट केली आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत नील आर्मस्ट्राँग यांच्या धर्मांतराचा दावा असत्य आढळला आहे. 

Avatar

Title:नील आर्मस्ट्राँग यांनी धर्मांतर केले होते का? वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •