Fact Check : इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी बनली बेस्टची पहिली महिला बस ड्रायव्हर?

False सामाजिक
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

बेस्टला मिळणार पहिली महिला चालक, अशी एक पोस्ट Lokmat ने प्रसिध्द केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. 

फेसबुक / Archive

तथ्य पडताळणी 

प्रतिक्षा दास या मुंबईतील बेस्टच्या पहिल्या महिला बस ड्रायव्हर आहेत का? हे जाणून घेण्यासाठी शोध घेतला असता आम्हाला खालील परिणाम दिसून आला. या परिणामात अनेक प्रतिक्षा दास या मुंबईतील बेस्टच्या पहिल्या महिला बस ड्रायव्हर म्हणून उल्लेख केलेला दिसून येतो. 

त्यानंतर आम्ही दैनिक लोकमतच्या बातमीत छायाचित्र सौजन्य- टाईम्स ऑफ इंडिया असे म्हटल्याने आम्ही टाईम्स ऑफ इंडियाच्या संकेतस्थळावर जाऊन हे वृत्त शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी खालील वृत्त दिसून आले. 

टाईम्स ऑफ इंडिया / Archive

टाईम्स ऑफ इंडियाच्या या बातमीत कुठेही ही बेस्टची पहिली महिला बस ड्रायव्हर असल्याचे म्हटलेले नाही. या वृत्ताच्या शीर्षकाचाही स्वैर अनुवाद केल्यास पारंपारिकतून जोखडातून मुक्त होत ही महिला बसणार बेस्ट बसच्या वाहनाचालकाच्या खुर्चीवर असा होतो. त्यानंतर प्रश्न पडतो मग लोकमतने असे वृत्त का दिले असावे. त्यानंतर आम्ही पुढे जात आम्ही आणखीही काही संकेतस्थळे पाहिली. स्टोरीपिक या इंग्रजी संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तात शीर्षकात प्रतिक्षा दास ही मुंबईतील पहिली महिला बस ड्रायव्हर असल्याचे म्हटले आहे. 

स्टोरीपिक / Archive

कॅच न्यूज या हिंदी संकेतस्थळानेही ती पहिली महिला बस ड्रायव्हर असल्याचा दावा आहे. वेगवेगळ्या संकेतस्थळांनी वेगवेगळे दावे केल्याने आमची सत्य जाणून घेण्याविषयी उत्सुकता वाढली. बेस्टच्या संकेतस्थळावर काही माहिती दिली आहे का, हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यावेळी संकेतस्थळावरील वाहतूक या विभागात आम्हाला बेस्टकडून दिंडोशी आगारात वाहतूक प्रशिक्षण केंद्र चालविण्यात येत असल्याचे दिसून आले. 

बेस्टचे संकेतस्थळ / Archive

दरम्यान बेस्टचे जनसंपर्क अधिकारी हनुमंत गोपणे यांनी फॅक्ट क्रेसेंडोशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार बेस्ट केवळ आपल्याच नाही तर खासगी वाहनचालकांनाही बस चालविण्याचे प्रशिक्षण देते. प्रतिक्षा दास असे बेस्टकडून प्रशिक्षण घेणाऱ्या पहिल्या महिला आहेत. त्यांनी बेस्टमध्ये काम करण्याची कोणतीही इच्छा अजून दर्शवलेली नाही. बेस्टनेही त्यांना अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. काही माध्यमांनी याबाबत दिलेले वृत्त चुकीचे आहे. मुंबई शहरात अनेक महिला या बस, मालमोटारी, टेम्पो व अवजड वाहने चालवत असल्याचेही त्यांनी नमूद केले. बुम लाईव्ह या संकेतस्थळानेही याची तथ्य पडताळणी केली आहे.

निष्कर्ष

प्रतिक्षा दास या बेस्टच्या पहिल्या महिला वाहनचालक नसून त्या बेस्ट वाहनचालक प्रशिक्षण केंद्रातून वाहनचालकाचे प्रशिक्षण घेत आहेत. बेस्टनेही त्यांना नोकरीचा कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. त्या अभियंत्या असून बेस्टकडून अशा प्रकारचे प्रशिक्षण घेणाऱ्या पहिल्या महिला आहेत. मुंबईत अनेक महिला या बस चालवत आहेत. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:Fact Check : इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी बनली बेस्टची पहिली महिला बस ड्रायव्हर?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •