Fact Check : झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी दारुच्या नशेत पत्रकार परिषद घेतली?

False राजकीय | Political

झारखंड मध्ये भाजपाचं सरकार आहे आणि तिथले मुख्यमंत्री रघुबर दास यांनी दारू पिऊन पत्रकार परिषद घेतली. #विकास_अब_टल्ली_हो_गया_है अशी एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

अक्राईव्ह

तथ्य पडताळणी

मुख्यमंत्री रघुबर दास यांनी दारू पिऊन पत्रकार परिषद घेतली का? याचा आम्ही शोध घेतला असता असे कोणतेही वृत्त आम्हाला दिसून आले नाही. त्यानंतर आम्ही या फोटोचा स्क्रीनशॉट घेतला. परिणामात आम्हाला  श्रेया बहुगुणा नावाच्या एका ट्टिविटर वापरकर्त्याद्वारे करण्यात आलेले रिट्विट दिसले.

या रिट्विटच्या आधारे आम्ही निधी नावाच्या एका ट्टिविटर अकाऊंटवर पोहचलो. या अकाउंटद्वारे आम्हाला समजले की, निधी या एबीपी न्यूज या वृत्तवाहिनीच्या पत्रकार आहेत. त्यांनी लिहिले आहे की, मी अतिशय सामान्यपणे नाकाला खाजवत असताना हा फोटो काढण्यात आलेला आहे. मी समाज माध्यमांवर प्रसारित होत असलेल्या या माहितीचे खंडन करत आहे की, कसल्यातरी अज्ञात वासामुळे मी माझा हात माझ्या नाकावर ठेऊन नाक बंद केलेले आहे. #रघुबरदास #सीईओझारखण्ड

अक्राईव्ह

त्यानंतर आम्हाला निधी यांचे लिंक्डइन प्रोफाइल दिसून आले. यात त्यांचे नाव निधी श्री असे लिहिलेले दिसून येते.

निष्कर्ष

रघुबर दास यांनी मद्यपान केलेले नव्हते. त्यामुळे पत्रकार निधी श्री नाकावर हात ठेवला आहे हा दावाही असत्य आढळला आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:Fact Check : झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी दारुच्या नशेत पत्रकार परिषद घेतली?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False