महिला आरक्षण विधेयकावर संसदेत झालेल्या चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदी अनुपस्थित होते, असा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. पुरावा म्हणून संसदेतील एक फोटो शेअर केला जात आहे.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल दावा भ्रामक आहे, पंतप्रधान मोदी महिला आरक्षण विधेयकावरील मतदान प्रक्रियेच्या वेळी उपस्थित होते, तसेच त्यांनी संसद भवनात या विधेयकावर आपले मतदेखील व्यक्त केले.

काय आहे दावा ?

व्हायरल फोटोमध्ये नितिन गडकरी, अमित शहा, राजनाथ सिंह आणि इतर भाजप खासदार संसद भवनमध्ये दिसतात.

हा फोटो शेअर करताना युजर्स कॅप्शनमध्ये लिहितात की, “महिला आरक्षणाच्या विधेयकाची चर्चा सुरू असताना मोदींची अनुपस्थिती.

मूळ पोस्ट – फेसबुक

तथ्य पडताळणी

कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, महिला आरक्षण विधेयकाची चर्चा तीन दिवस चर्चा चालली होती.

पाहिला दिवस

पंतप्रधान मोदी 19 सप्टेंबर रोजी नव्या संसद भवनात विशेष सत्रच्या पहिल्या दिवशी भाषण देताणा महिला आरक्षण (128 विधेयक) सादर केले.

संसद टीव्ही युट्यूब चॅनलवर या घोषणेचा व्हिडिओ उपलब्ध आहे.

https://youtu.be/vWuzyTRWRIk?si=jkjqJBtqKaHJqMAy&t=1362

दुसरा दिवस

व्हायरल फोटो 20 सप्टेंबर रोजी संसद भवनमध्ये 128 विधेयक वरील चर्चेचा आहे. या दिवशी अनेक खासदारांनी महिला आरक्षणावर (128 विधेयक) अपले मत मांडले होते.

खालील व्हिडिओमध्ये आपण व्हायरल फोटोतील दृश्य पाहू शकतो.

https://youtu.be/3cOqgnTKtXQ?si=OeK-hq58uoHnnLQF&t=498

या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित नव्हते. परंतु, अधिक सर्च केल्यावर कळाले की, 20 सप्टेंबर म्हणचे त्याच दिवशी महिला आरक्षणाच्या (128 विधेयक) मतदान आणि पारित करण्याच्या प्रक्रियेत नरेंद्र मोदी हजर होते.

या प्रक्रियेत महिला आरक्षणाला 454 लोकसभा सदस्यांनी आपली सहमती दिली.

या प्रक्रियेचा संपुर्ण व्हिडिओ येथे पाहू शकातात.

तिसऱ्या दिवस

महिला आरक्षणाला लोकसभेत संमती मिळाल्याबद्दल नरेंद्र मोदींनी 21 सप्टेंबर रोजी सर्व सदस्यांचे आभार मानले.

https://youtu.be/2BxyzPHtPwY?si=Uk0rTlrYGfKXqGL8&t=10

राज्यसभा

संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी (22 सप्टेंबर) राज्यसभेत महिला आरक्षण विधेयक (नारी शक्ती वंदन विधेयक) एकमताने मंजूर करण्यात आले. विशेष म्हणजे विधेयकाच्या विरोधात कोणीही मतदान केले नाही. सभागृहात उपस्थित सर्व 214 खासदारांनी विधेयकाला पाठिंबा दिला. आता हे विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार आहे. अधिक माहिती येथे पाहू शकतात.

https://youtu.be/0IieMUQO6is?si=YsGLeEYis-Wr9R7G

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल फोटोसोबत केलेला दावा भ्रामक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला आरक्षण चर्चेत अनुपस्थित नव्हते, चुकीच्या दाव्यासह फोटो व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:महिला आरक्षण विधेयकाच्या चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदी अनुपस्थिती होते? भ्रमक दावा व्हायरल

Written By: Sagar Rawate

Result: Misleading