एआयएमआयएम पक्ष प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांची शुक्रवारी एक सभा पार पडली. ओवैसी हे त्यांच्या आक्रमक भाषणामुळे नेहमीच चर्चेत राहतात. परंतु, औरंगाबाद (Aurangabad) येथे पार पडलेल्या सभेवेळी ओवैसी यांनी डान्स करुन नव्या चर्चांला उधाण आलं आहे. दरम्यान, ओवैसी यांचा अनोखा अंदाज पाहून अनेकजण आश्चर्यचकीत केले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, अशी माहिती Kaaltarang News Marathi या फेसबुक पेजवर देण्यात आली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

फेसबुकवरील मुळ पोस्ट / Archive

फेसबुकवर ही पोस्ट ओवैसी यांचे नृत्य म्हणून पसरत असल्याचे आपण खाली पाहू शकता.

तथ्य पडताळणी

एआयएमआयएम पक्ष प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी आपल्या प्रचारसभेत खरोखरच असे नृत्य केले का? हे शोधण्यासाठी आम्ही हा व्हिडिओ नीट पाहिला. आम्हाला या व्हिडिओ ANI या वृत्तसंस्थेचा लोगो दिसून आला. आपण एएनआयचे हे ट्विट खाली पाहू शकता.

https://twitter.com/ANI/status/1185248379799887872

एएनआयच्या या ट्विटनंतर अनेक राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनी याबाबतचे वृत्त दिल्याचेही दिसून येते.

आज तकचे मूळ वृत्त / Archive

विविध प्रसारमाध्यमांनी अशा प्रकारचे वृत्त दिल्यानंतर एआयएमआयएम पक्ष प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी याबाबत ट्विट करत आपण कोणतेही नृत्य केले नसल्याचे स्पष्ट केले. आपण केवळ आपल्या पक्षाचे चिन्ह पतंग असल्याने ते त्याची दोरी ओढून दाखवल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपण हे ट्विट खाली पाहू शकता.

https://twitter.com/smitaprakash/status/1185466052618022912

कोणतीही आपल्या व्हिडिओवर गाणे लावले असल्याचेही ओवैसी यांचे म्हणणे आहे.

https://twitter.com/mohsinaddeen96/status/1185463322465861632

https://twitter.com/XpressHyderabad/status/1185465944342028290

ओवैसी यांनी याबाबत औरंगाबाद येथे प्रसारमाध्यमांना दिलेला बाईटही आपण खाली पाहू शकता.

https://www.youtube.com/watch?v=MyekL326FOU

आपण सर्व प्रचारसभांमध्ये अशा प्रकारे पतंग उडविण्याचा अभिनय करुन दाखवत असल्याचे त्यांनी सांगितले. औरंगाबाद येथे दुसऱ्या एका सभेत त्यांनी असे करुन दाखवल्याचे आपण खाली पाहू शकता. नागरिकांनी ढिल ढिल असे म्हटल्यावर त्यांनी असे करुन दाखवले.

https://www.youtube.com/watch?v=UIJZgegVBbo&feature=youtu.be

निष्कर्ष

एआयएमआयएम पक्ष प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी आपल्या प्रचारसभेनंतर नृत्य करुन दाखवल्याचा दावा एका व्हिडिओच्या आधारे करण्यात येत आहे. हा व्हिडिओ सत्य आहे. त्यांनी नृत्य केले का, या प्रश्नावर स्वत: असदुद्दीन ओवैसी यांनी आपण नृत्य केले नसल्याचे म्हटले आहे. पक्षाचे चिन्ह पोहचविण्यासाठी प्रत्येक सभेनंतर आपण असे करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडो पडताळणीत ही पोस्ट संमिश्र स्वरुपाची आढळली आहे.

Avatar

Title:Fact : असदुद्दीन ओवैसी यांनी औरंगाबाद येथील सभेनंतर नृत्य करुन दाखवलं का?

Fact Check By: Ajinkya Khadse

Result: Mixture