Fact Check : चिपळूणमध्ये गटारात सापडलेली मगर मुंबईत सापडली म्हणून व्हायरल

False सामाजिक

मुंबईत मगर सापडली आहे का, याची विचारणा करणारा एक संदेश फॅक्ट क्रेसेंडोला व्हॉटसअपवर मिळाला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडिओची तथ्य पडताळणी केली आहे.

अशीच एक पोस्ट Sharethis नेही फेसबुकवर पोस्ट केली आहे. यात मुंबईतील एका स्थानकाजवळ मगर सापडली असल्याचे म्हटले आहे. 

फेसबुक / Archive

मराठीप्रमाणेच इंग्रजीतही मुंबईत नाल्यात मगर सापडली म्हणून ही पोस्ट अनेक ठिकाणी शेअर करण्यात येत आहे. आपण हे तुलनात्मकरित्या खाली पाहू शकता.

फेसबुक लिंक / Archive 

तथ्य पडताळणी

मुंबईत मगर सापडल्याची घटना घडली आहे का, हे शोधण्यासाठी आम्ही गुगलवर मगर सापडली असा शब्दप्रयोग करुन शोध घेतला. यावेळी आम्हाला खालील परिणाम दिसून आला.

यावेळी आम्हाला महाराष्ट्र टाईम्सचे खालील ट्विट दिसून आले. या वृत्तात  चिपळूण येथे दादर मोहल्ला परिसरात पुराच्या पाण्यातून गटारात आलेली मगर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पिंजऱ्यात जेरबंद केल्याचे वृत्त दिसून आले. महाराष्ट्र टाईम्सने 28 जुलै 2019 रोजी हे ट्विट करताना ही कालची घटना असल्याचे म्हटले आहे.

Zee 24 तासनेही या घटनेचे वृत्त दिले आहे. चिपळूण शहरात पुराच्या पाण्यातून मगर नाल्यात, नदीतल्या मगरींना पुराचा फटका असे या वृत्तात म्हटले आहे. आपण हे वृत्त खाली पाहू शकता.

याबाबत आम्ही रत्नागिरी-चिपळूणचे विभागीय वनाधिकारी विजयराज सुर्वे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “27 जुलै 2019 रोजी आम्हाला माहिती मिळाली की, चिपळूणमधील दादर मोहल्ल्यात एका नाल्यात मगर आहे. वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही मगर पकडली. समाजमाध्यमांवर पसरत असलेल्या व्हिडिओत मुंबईच्या दादरमध्ये ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. नामसाम्यामुळे असे होत असावे. चिपळूनमधील दादर मोहल्ला हा एक भाग आहे. मगरीला मुंबईच्या दादरमधून नाही तर चिपळूनच्या दादर मोहल्ल्यातून पकडण्यात आले आहे. 

निष्कर्ष

मुंबईत येथे गटारात मगर आढळलेली नाही. चिपळूण शहरात नदीला पूर आल्यानंतर गटारात मगर आढळली आहे. या घटनेचा व्हिडिओ आता मुंबईत मगर आढळल्याचे सांगत पसरविण्यात येत आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:Fact Check : चिपळूणमध्ये गटारात सापडलेली मगर मुंबईत सापडली म्हणून व्हायरल

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False