चीनमधील महामार्गाचा फोटो भारताच्या नावाने व्हायरल; वाचा सत्य
काही दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या अपघातानंतर शिंदे-फडणवीस सरकारच्या काळातील महामार्गांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहेत.
या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर अशा टीकाकारांना उत्तर एका सुसज्ज महामार्गाचा फोटो शेअर केला जात आहे. त्यासोबत उपरोधकपणे म्हटले की, भारत एकमेव देश आहे जेथे अपघातासाठी चांगल्या रस्त्याला दोष दिला जातो.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून तो कुठला आहे याची विचारणा केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटोमधील महामार्ग भारतातील नाही.
काय आहे दावा ?
महामार्गाचा फोटो शेअर करत युजर्स लिहितात की, “भारत जगातील एकमेव देश आहे जिथे अपघातासाठी चांगल्या रस्त्याला दोष देतात.”
मूळ पोस्ट – फेसबुक
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर Caixin Global या वेबसाईटवर व्हायरल आढळला. हा फोटो भारतातील नसून चीनमधील एका महामार्गाचा आहे.
मूळ पोस्ट – Caixin
Gansu गांसू या वेबसाईटनुसार या महामार्गचे नाव वेईवू हायवे आहे. या महामार्गाचे काम 2020 मध्ये पूर्ण झाले होते.
तसेच हा महामार्ग चीनच्या लॉन्गनान सेक्शनमधील बैलोंगजियांग या नदीवर आहे.
वरील माहितीच्या आधारे शोध घेतल्यावर गुगल अर्थवर फोटोतील जागा सापडली.
मूळ पोस्ट – गुगल अर्थवर
निष्कर्ष
या वरुन सिद्ध होते की, व्हायरल फोटोमधील महामार्ग भारतातील नसून चीनमधील आहे. चुकीच्या दाव्यासह फोटो व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)
.hocal_container_hocal {
border: 2px solid #000;
background-color: #eee;
border-radius: 5px;
padding: 16px;
margin: 16px 0
}
.hocal_container_hocal::after {
content: "";
clear: both;
display: table;
}
.hocal_container_hocal img {
float: left;
margin-right: 20px;
border-radius: 50%;
}
.hocal_container_hocal span {
font-size: 20px;
margin-right: 15px;
}
@media (max-width: 500px) {
.hocal_container_hocal {
text-align: center;
}
.hocal_container_hocal img {
margin: auto;
float: none;
display: block;
}
}
Title:चीनमधील महामार्गाचा फोटो भारताच्या नावाने व्हायरल; वाचा सत्य
Written By: Sagar Rawate
Result: False