प्रखर सूर्यप्रकाशात कोरोना विषाणू नष्ट होतो का? वाचा सत्य

Coronavirus False वैद्यकीय

प्रखर सूर्यप्रकाश कोरोना विषाणू नष्ट करतो, असा दावा सध्या समाजमाध्यमातून करण्यात येत आहे. प्रखर सूर्यप्रकाश (UV rays) च्या सानिध्यात कोरोना व्हायरस टिकाव धरू शकणार नाही. दरवर्षी साधारण 13 मे च्या आसपास पुण्यात झिरो शेडो (shadow) डे असतो. म्हणजे सूर्याची किरणे 90° मध्ये भूतलावर पडतात. उन्हाची तीव्रता अधिक असल्याने 13 मे नंतर पुणे भागात कोरोना व्हायरस गायब झालेला असेल, असा दावा हर्षल लोहकरे यांनी केला आहे. प्रखर सुर्यप्रकाशाने खरोखरच कोरोना विषाणू नष्ट होतो का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

screenshot-www.facebook.com-2020.03.28-15_34_35.png

फेसबुकवरील मुळ पोस्ट

तथ्य पडताळणी 

सुर्यप्रकाश अथवा अल्ट्रा व्हायलट म्हणजेच अतिनील किरणे कोरोना विषाणू नष्ट करतात, याचा आम्ही शोध घेतला. त्यावेळी बीबीसीने 28 मार्च 2020 रोजी दिलेले एक वृत्त आम्हाला दिसून आले. या वृत्तानुसार केवळ एका पध्दतीची अतिनील किरणेच कोरोना विषाणूवर प्रभावी असल्याचे दिसून येत आहे. सुर्यप्रकाश किंवा सुर्यातून निघणारी अतिनील किरणे ही कोरोना विषाणूवर प्रभावी नसल्याचेही यात स्पष्ट करण्यात आले आहे. सुर्यातून निघणारे ही किरणे तीन प्रकारची असतात. यातील काही किरणे ही त्वचेला हानीकारक ठरु शकतात, असेही या वृत्तात स्पष्ट करण्यात आले आहे.

screenshot-www.bbc.com-2020.03.28-16_26_55.png

बीबीसीवरील सविस्तर लेख / Archive

टाईम (Archive) मासिकाने दिलेल्या वृत्तानुसार, जर कडक उन्हात कुणी शिंकलं तर कोरोना असलेले ड्रॉपलेट लवकर वाळतील आणि त्यामुळे कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात मंदावू शकतो. विषाणूतज्ज्ञ डॉ. परेश देशपांडे यांनीही बीबीसी मराठीशी बोलताना,  तापमान वाढल्यामुळे फार तर त्याच्या नष्ट होण्याचा काळ कमी होऊ शकतो, असे म्हटलेले आहे. जागतिक आरोग्य संघटनाही उष्ण आणि दमट हवामानात कोरोना विषाणू नष्ट होत नसल्याचे म्हणते. त्यानंतर आम्हाला पत्र सुचना कार्यालयाचे एक ट्विट दिसून आले. यात सुर्यप्रकाशामुळे कोरोना विषाणू नष्ट होतो, याचा कोणताही पुरावा नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Archive

निष्कर्ष 

सुर्यप्रकाशामुळे कोरोना विषाणू नष्ट होत नाही. उन्हामुळे केवळ विषाणू नष्ट होण्याचा काळ मात्र कमी होतो. त्यामुळे सुर्यप्रकाशामुळे कोरोना विषाणू नष्ट होतो हा दावा असत्य आहे.

Avatar

Title:प्रखर सूर्यप्रकाशात कोरोना विषाणू नष्ट होतो का? वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False