भारताच्या मित्रराष्ट्रानेही केले एअर स्ट्राईक ? : सत्य पडताळणी

True आंतरराष्ट्रीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

(Image is only for Representation purpose only . source: News Gaza)

सोशल मीडियावर सध्या भारताचा मित्र राष्ट्राने केले 100 ठिकाणी एअर स्ट्राईक या आशयाची पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टला फॅक्ट क्रिसेंडोने पडताळणी करेपर्यंत 175 शेअर मिळाले आहेत.

फेसबुक

अर्काईव्ह

या विषयावर विविध वर्तमानपत्रात बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.

लोकमत न्युज 18अर्काईव्ह

दैनिक जागरणअर्काईव्ह

व्हायरल होणाऱ्या फेसबुक पोस्टमधील लेखामध्ये भारताचा मित्रराष्ट्र असा उल्लेख केला आहे. त्यामुळे एअर स्ट्राईक केलेले राष्ट्र हे भारताचे मित्र राष्ट्र आहे का? हे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी गुगलवर भारत के मित्र राष्ट्र असे शोधल्यावर खालील रिझल्ट समोर आले.

त्यानंतर वृत्तपत्रांमधील बातम्यांमध्ये इस्रायल या राष्ट्राने एअर स्ट्राईक केल्याचा उल्लेख आला आहे. त्यामुळे भारताचे कोण मित्रराष्ट्र शोधण्यासाठी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाइटवर इस्त्राईल बद्दल माहिती शोधल्यावर, विझीटस् या विभागात इएएम म्हणजेच एक्सटर्नल अफेअर्स मिनीस्टर्स म्हणजेच परराष्ट्र मंत्रालय येथे क्लिक केल्यानंतर इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांचा भारतात दौरा झाला असल्याचा उल्लेख आढळला. खाली दिलेल्या लिंकवर आपण सविस्तर माहिती वाचू शकता.

विदेश मंत्रालय भारत सरकारअर्काईव्ह

त्याचप्रमाणे युट्युब वर इंडियाज टॉप फॅक्टस् या चॅनलवर भारत के मित्रराष्ट्र या संदर्भातील व्हिडिओ 23 जुलै 2017 ला अपलोड करण्यात आला आहे.

अर्काईव्ह

इस्रायल हा भारताचा दुसऱ्या नंबरचा मित्र राष्ट्र आहे. त्यानंतर इस्रायलने एअर स्ट्राईक केले की नाही?  याची पडताळणी केली. इस्रायलच्या एअर स्ट्राईकबद्दल अल-जजीरा डॉट कॉम या वेबसाइटवर एक बातमी प्रसिद्ध झाली आहे.

अलजजीरा डॉट कॉमअर्काईव्ह

VOXअर्काईव्ह

इस्रायलने हमास या दहशदवादी संघटनेच्या 100 तळांवर हवाई हल्ला केल्याचे वृत्त एपी या वृत्तसंस्थेने दिले आहे.

AP NEWS l अर्काईव्ह

इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाच्या ऑफिशिअल ट्विटर अकाऊंटवर इस्रायल एअर स्ट्राईकबद्दल माहिती देण्यात आली आहे.

अर्काईव्ह

सर्व तथ्यांचा अभ्यास केला असता असे दिसून आले की सोशल मीडियावर व्हायरल होणारा भारताच्या मित्रराष्ट्राने केला एअर स्ट्राईक हे सत्य आहे.

निष्कर्ष : भारताच्या मित्रराष्ट्राने केला एअर स्ट्राईक या विषयावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमधील मित्रराष्ट्र हा भारताचा असून, त्या मित्रराष्ट्राचे नाव इस्रायल असे आहे. इस्रायलने एअर स्ट्राईक केला हे वृत्त खरे आहे.

Avatar

Title:भारताच्या मित्रराष्ट्रानेही केले एअर स्ट्राईक ? : सत्य पडताळणी

Fact Check By: Amruta Kale 

Result: True


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •