कणेरी मठ येथील सिद्धेश्वर वस्तूसंग्रहालयाचा व्हिडिओ कर्नाटकातील म्हणून व्हायरल; वाचा सत्य

False सामाजिक

कर्नाटकमध्ये किंवा कोलकाता येथे एका कुंभार कारागिराने मूर्तीचे गाव बनविले आहे. या मूर्त्यात फक्त जीव टाकण्याचे बाकी राहिले आहे, असा व्हिडीओसुद्धा बघण्याचे भाग्य नशिबात असावे लागते. सलाम या कारागिराला, असा दावा करत सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, हा व्हिडिओ नेमका कोणत्या गावातील आहे, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

फेसबूक पोस्ट / संग्रहित

तथ्य पडताळणी

कर्नाटकमधील किंवा कोलकाता येथील एका कुंभार कारागिराने मुर्तीचे गाव बनवले आहे का, याचा शोध घेतला. त्यावेळी कोल्हापूरपासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या कणेरी मठ या गावाची माहिती विकीपीडियावर दिसून आली. या गावात एक सिद्धगिरी नावाचे वस्तुसंग्रहालय आहे. शहरीकरणामध्ये लुप्त होऊ पहात असलेल्या ग्रामीण जीवनशैलीचे मूर्तिमंत नमुने येथे उभे करण्यात आल्याची माहिती येथे देण्यात आली आहे. महाराष्ट्र टाईम्सच्या (संग्रहित) संकेतस्थळावरही या मठाची आणि वस्तूसंग्रहालयाची माहिती देणारा एक लेख दिसून आला. कणेरी मठ येथील या सिद्धगिरी वस्तुसंग्रहालयाची माहिती देणारे अनेक व्हिडिओ देखील युटूयूबवर असल्याचे दिसून आले.

संग्रहित

संग्रहित

याशिवाय सिद्धेश्वर मठाचे कडसिद्धेश्वर स्वामींच्या अनेक मुलाखतीही युटूयूबवर दिसून आल्या. यातील त्यांच्या एका मुलाखतीत सिद्धगिरी वस्तू संग्रहालयाची दृश्ये दाखवण्यात आली आहेत. ती आपण खाली पाहू शकता.    

संग्रहित

त्यानंतर कोलकाता येथे असलेल्या वस्तूसंग्रहालयाचा व्हिडिओ देखील आम्ही पाहिला. या वस्तूसंग्रहायाचे स्वरूप मात्र भिन्न असल्याचे आणि ते व्हायरल व्हिडिओशी जुळत नसल्याचे दिसून आले. 

संग्रहित

यातून हे स्पष्ट झाले की, समाजमाध्यमात कर्नाटकात किंवा कोलकाता येथे एका कुंभार कारागिराने मुर्तीचे गाव बनवल्याचा म्हणून व्हायरल होणारा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील कणेर मठ गावातील सिद्धगिरी वस्तू संग्रहालयाचा आहे.

निष्कर्ष 

कर्नाटकात किंवा कोलकाता येथे एका कुंभार कारागिराने मुर्तीचे गाव बनवल्याचा हा व्हिडिओ असल्याचा दावा असत्य आहे. हे कणेर मठ येथील सिद्धगिरी वस्तूसंग्रहालय आहे.

Avatar

Title:कणेरी मठ येथील सिद्धेश्वर वस्तूसंग्रहालयाचा व्हिडिओ कर्नाटकातील म्हणून व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False