मिझोरामच्या राज्यपालपदी शिवसेनेचे लिलाधर डाके, अशी एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

Archive

तथ्य पडताळणी

शिवसेनेचे लिलाधार डाके यांची राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे का याची पडताळणी करण्यासाठी आम्ही सर्वप्रथम मिझोराम सरकारच्या संकेतस्थळास भेट दिली. या ठिकाणी आम्हाला (दिनांक 17 जून 2019 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता) मिझोरामचे राज्यपाल प्रा. जगदीश मुखी हेच असल्याचे दिसून आले.

Archive

नवभारत टाईम्सने 8 मार्च 2019 रोजी दिलेल्या वृत्तानुसार जगदिश मुखी हे आसामबरोबरच मिझोरामचे प्रभारी राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत.

Archive

त्यानंतर आम्ही अन्य कोणी याबाबत काही वृत्त दिले आहे का याची पडताळणी केली. त्यावेळी आम्हाला टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीचे खालील वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लिलाधर डाके यांची मिझोरामच्या राज्यपालपदी वर्णी लागल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. या वृत्तात त्यांची नियुक्ती जवळजवळ निश्चित झाले असल्याचे म्हटले असले तरी त्यांची नियुक्ती झाली असल्याचे म्हटलेले नाही.

Archive

नेटवर्क 18 लोकमतने याबाबतचे वृत्त देताना शिवसेना नेते लीलाधर डाके मिझोरामचे राज्यपाल होणार असे म्हटले आहे. हा व्हिडिओ आपण खाली पाहू शकता.

https://www.youtube.com/watch?v=p5fr-PvaXMQ

निष्कर्ष

मिझोरामचे राज्यपाल म्हणून लिलाधर डाके यांची नियुक्ती अद्याप झाली नसल्याचे मिझोराम सरकारच्या संकेतस्थळावरुन स्पष्ट होत आहे. याबाबत सोशल मीडियावर पसरत असलेली माहिती असत्य असल्याचे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत आढळून आले आहे.

Avatar

Title:Fact Check : शिवसेनेचे लिलाधर डाके मिझोरामचे राज्यपाल?

Fact Check By: Dattatray Gholap

Result: False