भारतीय जवान व रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी धक्क देऊन बंद रेल्वे सुरू केली का ? वाचा सत्य
एका बंद पडलेल्या रेल्वेला सुरू करण्यासाठी रेल्वेच्या कर्मचारी आणि भारतीय सैनिकांना धक्का मारावा लागला, या दाव्यासह सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हिडिओमध्ये आग लागलेल्या डब्ब्यांपासून इतर डब्ब्यांना दूर ढकलण्यात येत होते.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये भारतीय सैनिक आणि काही रेल्वे प्रशासकीय कर्मचारी एका रेल्वेला धक्का देताना दिसतात.
लोकसत्ता, सकाळ, लोकमत, साम टीव्ही न्यूज आणि आपलं महानगर या वृतपत्रांनी बातम्या प्रसिद्ध केल्या की, "भारतीय रेल्वे जवान, पोलिस आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी चक्क बंद ट्रेनला धक्का देत सुरु केले."
हा व्हिडिओ शेअर करताना युजर्स कॅप्शनमध्ये लिहितात की, “हे काय ? रेल्वे ला धक्का ? आता एवढेच बघायचं राहिलं होतं !” “सैनिकांनाच धक्का मारत सुरु करावं लागली रेल्वे गाडी.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर एनडीटीव्हीच्या युट्यूब चॅनलवर व्हायरल व्हिडिओ आढळला. सोबत महिती दिली की, ही घटना 10 जुलै रोजी हावडापासून सिकंदराबादकडे जाणाऱ्या फलकनुमा एक्स्प्रेस ट्रेनमध्ये पाच बोगींना आग लागली होती.
द हिंदूच्या बातमीनुसार ही घटना बीबीनगर रेल्वे स्थानकाजवळ गुंटूर विभागातील बोम्मईपल्ली-पगीडिपल्ली सेक्शनजवळ घडली होती.
हावडापासून सिकंदराबादकडे जाणाऱ्या रेल्वे क्रमांक 12703 फलकनुमा एक्स्प्रेसमध्ये सकाळी 11.20 वेळी S2 ते S6 या डंब्यांमध्ये आग लागली होती.
धूर झाल्याचे लक्षात येताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ ट्रेन थांबवली. ऑन-बोर्ड कर्मचार्यांनी तत्काळ प्रवाशांना ट्रेनमधून उतरवण्यात मदत केली.
तेलंगना टूडेने या घटने संबंधिक एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये आपण लोकांना S7 क्रमांकाची रेल्वे बोगीला ढकलताना दिसतात आणि समोर आग लागलेल्या बोगीला लोक विझवण्याचा प्रयत्न करत आहे.
तर अम्मा फाउंडेशन नलगोंडा या युट्यूब चॅनलने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये लोकांना S1 क्रमांकापासून रेल्वे बोगी पुढे ढकलताना दिसतात.
खालील तुलनात्मक फोटोमध्ये फलकनुमा एक्स्प्रेसच्या बोगींची रचना दाखवलेली आहे. लाल तकत्यातील S2, S3, S4, S5 आणि S6 या बोगींना आग लागली होती.
तर हिरवा रंगाच्या तकत्यातील रेल्वे इंजिन ते S1 आणि S7 बोगीपासून ते उच्च क्षमतेचे पार्सल वाहून नेणाऱ्या बोगीना आग लागलेल्या डब्यांपासून वेगळे केले गेले होते.
भोंगीरचे डीसीपी एम. राजेश चंद्र यांनी डेक्कन क्रॉनिकलला सांगितले की, वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे डबे ओढण्यासाठी सिकंदराबादवरुन डिझेल इंजिन मागवण्यात आहे. परंतु, त्यांला घटना स्थळी पोहचायला एक तास लाणार होता.
तेव्हा काही अधिकाऱ्यांनी पर्यायी मोर्ग शोधत आणि विशेष दलाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने डबे ढकलण्यास सुरुवात केली व सुरक्षित अंतरावर डब्यांना ढकलण्यात यश आले, त्यामुळे पुढील नुकसान टाळले.
डीसीपी एम. राजेश चंद्र यांनी ट्विट करत सांगितले की, "भोंगीरजवळ फलकनुमा एक्स्प्रेसमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेला रचकोंडा पोलिसांनी तत्परतेने प्रतिसाद दिला होता व इतर विभागांसह बचाव कार्यात भाग घेतला होता. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे सहकार्य होते. तसेच या घटनेत कोणीही जखमी झाले नाही व सर्व प्रवासी सुरक्षित आहेत याचा आनंद आहे."
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, बंद रेल्वेला सुरू करण्यासाठी नाही, तर आगी पासून डब्बे दूर करण्यासाठी डब्बे ढकलण्यात आले होते. चुकीच्या दाव्यासह हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)
.hocal_container_hocal {
border: 2px solid #000;
background-color: #eee;
border-radius: 5px;
padding: 16px;
margin: 16px 0
}
.hocal_container_hocal::after {
content: "";
clear: both;
display: table;
}
.hocal_container_hocal img {
float: left;
margin-right: 20px;
border-radius: 50%;
}
.hocal_container_hocal span {
font-size: 20px;
margin-right: 15px;
}
@media (max-width: 500px) {
.hocal_container_hocal {
text-align: center;
}
.hocal_container_hocal img {
margin: auto;
float: none;
display: block;
}
}
Title:भारतीय जवान व रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी धक्क देऊन बंद रेल्वे सुरू केली का ? वाचा सत्य
Written By: Sagar Rawate
Result: False