गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत (नवरात्रात) मोदींनी 13 राज्यात 23 प्रचारसभा घेतल्या का? : सत्य पडताळणी

True राजकीय

सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत (नवरात्रात)13 राज्यात 23 प्रचारसभा घेतल्या, असा दावा करण्यात आला आहे. फॅक्ट क्रिसेंडोने सत्य पडताळणी करेपर्यंत ही पोस्ट फेसबुकवर अजय ननावरे या अकाउंटवरुन व्हायरल झाली आहे.

फेसबुक

अर्काईव्ह

सत्य पडताळणी

फेसबुकवर ही पोस्ट इतर अकाउंटवरही व्हायरल झाली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये गुढीपाडव्या पासून रामनवमीपर्यंत 9 दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 13 राज्यांत मिळून 23 प्रचार सभा घेतल्या असा दावा करण्यात आला आहे. याबद्दल गुगलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 6 एप्रिल ते 13 एप्रिल प्रचारसभा असे सर्च केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुढीपाडवा ते रामनवमी (नवरात्रात) 13 राज्यात मिळून 23 प्रचारसभा घेण्यात आल्या आहेत, याबद्दल वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध झाली आहे. खाली दिलेल्या लिंकवर आपण सविस्तर वृत्त वाचू शकता.

हिंदुस्तान टाईम्सअर्काईव्ह

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पीएमओ कार्यालयाच्या ऑफिशिअल वेबसाईटवर पंतप्रधान मोदी यांच्या गुढीपाडवा ते रामनवमी (नवरात्र) म्हणजेच 06 एप्रिल ते 13 एप्रिल 2019 दरम्यान भारतात कुठे कुठे दौरा झाला त्याबद्दल सविस्तर माहिती मिळाली.

06 एप्रिल 2019

07 एप्रिल 2019

08 एप्रिल 2019 रोजी कोणतीही प्रचारसभा पंतप्रधान मोदींनी घेतल्याचा उल्लेख पीएमओ कार्यालयाच्या वेबसाईटवर नाही.

09 एप्रिल 2019

10 एप्रिल 2019

11 एप्रिल 2019

12 एप्रिल 2019

13 एप्रिल 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 06 एप्रिल ते 13 एप्रिल 2019 या 9 दिवसांतील प्रचारसभा यांची बेरीज केला असता, 24 अशी होते. तसेच एकूण संपुर्ण भारतातील 13 राज्यांमध्ये या प्रचारसभा घेण्यात आल्या आहेत. गुढीपाडवा ते रामनवमी या काळातील पंतप्रधान मोदींची प्रचारसभा झालेले राज्य खालीलप्रमाणे आहे.

ओडिशा, छत्तीसगढ, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मणीपूर, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, गोवा, बिहार, आसाम, केरळ. या सर्व राज्यांची बेरीज केली असता एकूण 13 राज्य होतात.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये करण्यात आलेला दावा गुढीपाडवा ते रामनवमी (नवरात्रात) मोदींनी 13 राज्यात घेतल्या 23 प्रचारसभा हे तथ्य खरे आहे.

निष्कर्ष : सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये गुढीपाडवा ते रामनवमी (नवरात्रात) मोदींनी 13 राज्यांत घेतल्या 23 प्रचारसभा हे तथ्य खरे आहे.  

Avatar

Title:गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत (नवरात्रात) मोदींनी 13 राज्यात 23 प्रचारसभा घेतल्या का? : सत्य पडताळणी

Fact Check By: Amruta Kale 

Result: True