सर्वोच्च न्यायालयाचे ब्रीदवाक्य बदललेले नाही; वाचा सत्य

False सामाजिक

सर्वोच्च न्यायालयाचे “सत्यमेव जयते” हे ब्रीदवाक्य बदलण्यात आले, असा दावा केला जात आहे. त्याजागी “यतो धर्मस्ततो जयः” असे नवे ब्रीदवाक्य लिहिण्यात आल्याचे व्हायरल पोस्टमध्ये म्हटले जात आहे.

फॅक्ट क्रेसेंडोने यासंबंधी पडताळणी केल्यावर कळाले की, हा दावा खोटा आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आधीपासून “यतो धर्मस्ततो जयः” हेच ब्रीदवाक्य राहिलेले आहे.

काय आहे पोस्टमध्ये?

screenshot-www.facebook.com-2020.08.22-10_40_48.png

फेसबुक पोस्ट / संग्रहित

तथ्य पडताळणी 

सर्वोच्च न्यायालयाचे ब्रीदवाक्य बदलण्यात आले का याचा इंटरनेटवर शोध घेतला असता, तशी माहिती देणारी एकही अधिकृत बातमी सापडली आहे. असा बदल करण्यात आला असता तर नक्कीच त्याची बातमी झाली असती. परंतु, तसे काहीच आढळत नाही.

सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावरदेखील ब्रीदवाक्यामध्ये बदल करण्यात आल्याचे दिसून येत नाही. Advocatemunday या ब्लॉगवर सर्वोच्च न्यायालयाच्या ब्रीदवाक्याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली असून त्यातही हे ध्येयवाक्य यतो धर्मस्ततो जयः हेच असल्याचे म्हटले आहे. 

सर्वोच्च न्यायालयातील वकील पायल गायकवाड यांनी सुप्रीम कोर्ट अस्तित्वात असल्यापासून हा उल्लेख असल्याचे स्पष्ट केले आहे. 

अशोक स्तंभाखाली असणारे “सत्यमेव जयते” हे ब्रीदवाक्य बदलण्यात आल्याची अफवा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

केंद्रीय पत्र व सूचना कार्यालयानेसुद्धा ट्विटरवर याविषयी खुलासा प्रसिद्ध केला. त्यात म्हटले की, सर्वोच्च न्यायालयाचे ब्रीदवाक्य बदलण्यात आलेले नाही. ते कायमच “यतो धर्मस्ततो जयः” असे राहिलेले आहे. 

संग्रहित

निष्कर्ष 

सर्वोच्च न्यायालयाचे ब्रीदवाक्य पहिल्यापासून ‘यतो धर्मस्ततो जयः’ असेच आहे. ते ‘सत्यमेव जयते होते’ असे कधीच नव्हते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे ब्रीदवाक्या बदलल्याची निव्वळ अफवा आहे.

Avatar

Title:सर्वोच्च न्यायालयाचे ब्रीदवाक्य बदललेले नाही; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False