अभिनेता जावेद हैदरवर उपजीविकेसाठी भाजी विकण्याची वेळ आली आहे का? वाचा सत्य

False सामाजिक

अभिनेता जावेद हैदरवर लॉकडाऊनमुळे भाजी विकण्याची वेळ आली असल्याच्या संदेशासोबत सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जावेद हैदरवर लॉकडाऊनमुळे अशी वेळ आली का? त्यामुळे तो भाजी विकत आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

फेसबुक पोस्ट / संग्रहित

तथ्य पडताळणी 

अभिनेता जावेद हैदरवर उपजीविकेसाठी खरोखरच भाजी विकण्याची वेळ आली का, हे जाणून घेण्यासाठी शोध घेतला. त्यावेळी दैनिक सकाळ, लोकमत या संकेतस्थळांनी अभिनेता जावेद हैदरवर उपजीविकेसाठी भाजी विकण्याची वेळ आली असल्याचे वृत्त 29 जुन 2020 रोजी दिल्याचे दिसून आले. 

screenshot-www.lokmat.com-2020.06.30-19_58_53.png

लोकमतच्या संकेतस्थळावरील वृत्त / संग्रहित 

त्यानंतर अभिनेत्री डॉली ब्रिंद्रा यांनीही हा व्हिडिओ 25 जुन 2020 रोजी पोस्ट केला असल्याचेही दिसून आले. या पोस्टमध्ये त्यांनी हे अभिनेते जावेद हैदर असून ते आज भाजी विकत असल्याचे म्हटले आहे.

संग्रहित

अभिनेता जावेद हैदर याने आता यावर टाईम्स वृत्तपत्र समुहाला 29 जुन 2020 रोजी मुलाखत (संग्रहित) दिली. या मुलाखतीत आपली आर्थिक स्थिती उत्तम असून आपण टिकटॉकसाठी हा व्हिडिओ बनवला असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी नेमके काय म्हटलंय हे आपण खाली पाहू शकता. 

javed hyder Etimes.png

द टाईम्स ऑफ इंडिया / संग्रहित

निष्कर्ष

अभिनेता जावेद हैदरवर उपजीविकेसाठी भाजी विकत असल्याचे असत्य आहे. त्याने स्वत: याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

Avatar

Title:अभिनेता जावेद हैदरवर उपजीविकेसाठी भाजी विकण्याची वेळ आली आहे का? वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False