बिलकिस बानो प्रकरणातील गुन्हेगारांना तुरुंगात टाका असे अरविंद केजरीवाल म्हणाले का?

False राजकीय | Political

दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया यांनी गुजरातमधील एका कार्यक्रमात बिलकिस बानो प्रकरणातील गुन्हेगारांविषयीच्या प्रश्नाला उत्तर देण्याचे टाळल्यामुळे ‘आप’ पक्षाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. 

यानंतर आता ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा एक व्हिडिओ शेअर केला जात आहे ज्यामध्ये ते आरोपींना तुरुंगात टाकण्याचे वक्तव्य करतात. दावा केला जात आहे की, केजरीवाल यांचे हे वक्तव्य बिलकिस प्रकरणातील गुन्हेगारांविषयीचे आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

आमच्या पडताळणीत हा दावा खोटा आढळला. हा व्हिडिओ दोन वर्षांपूर्वीचा असून केजरीवाल दिल्ली दंगलीविषयी बोलत होते. 

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये केजरीवाल म्हणतात, “प्रत्येक वेळेस नेत्यांना प्रश्न विचारे बरोबर आहे का ? आरोपींना उचलून तुरुंगात टाकले पाहिजे.”

हा व्हिडिओ शेअर करताना यूजर लिहितात की, “दंगेखोर आणि बलत्काराच्या विरोधात अरविंद केजरीवाल यांचे विचार स्पष्ट आहेत.”

फेसबुक 

ट्विटर   

तथ्य पडताळणी

या व्हिडिओमधील फोटो कीफ्रेम गुगल रिसर्च केले असता आढळले की, 27 फब्रुवारी 2020 रोजी हिंदुस्तान टाइम्सच्या युट्यूब चॅनलवर या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता.

यामध्ये अरविंद केजरीवाल दिल्लीमध्ये झालेल्या दंगलीला कारणीबूत आरोपींना शिक्षा झाली पाहिजे आणि पीडितांना नुकसान भरपाई दिली जाईल, असे म्हणाले होते. दंगलीवरून राजकारण पेटलेले असताना अरविंद केजरीवाल यांनी हे विधान केले होते. 

या व्हिडिओमध्ये 1.19 मिनिटांपासून व्हायरल क्लिपमधील विधान पाहू शकता.

दिल्ली दंगलीप्रकरणी 106 जणांना अटक करण्यात आली होती. दंगलीमध्ये 27 लोकांचा मृत्यू झाला होता. 

निष्कर्ष 

यावरुन सिद्ध होते की, अरविंद केजरीवाल यांचा हा व्हिडिओ 2 वर्ष जुना असून यात त्यांनी बिलकिस बानो प्रकरणाबद्दल कोणतेच वक्तव्य केलेले नाही. 

(तुमच्याकडेदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर त्यांची सत्यता जाणून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. आमचे लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर वर फॉलो करा.)

Avatar

Title:बिलकिस बानो प्रकरणातील गुन्हेगारांना तुरुंगात टाका असे अरविंद केजरीवाल म्हणाले का?

Fact Check By: Sagar Rawate 

Result: False