Fact Check : पाकिस्तानी नागरिकांनी विश्वचषकातील पराभव दिसू लागल्यावर टीव्ही फोडला?

False Sports आंतरराष्ट्रीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

पाकिस्तानी चाहत्यांच्या टीव्ही फोडून जल्लोष, अशी एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इंग्लंडमधील मँचेस्टर शहरात दिनांक 16 जून 2018 रोजी भारत विरुध्द पाकिस्तानचा सामना झाला होता. या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा 89 धावांनी पराभव केला. त्यानंतर हा टीव्ही फोडण्यात आल्याचा दावा या पोस्टद्वारे करण्यात आला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

Archive

तथ्य पडताळणी

आम्ही या व्हिडिओच्या लहान-लहान प्रतिमा घेतल्या आणि त्याची रिव्हर्स इमेज सर्चद्वारे पडताळणी केली. त्यानंतर आम्हाला जो निकाल मिळाला तो आपण खाली पाहू शकता.

या शोधाच्या निकालातच आम्हाला युटूयूबची एक लिंक मिळाली. यात ‘Urgent Electronic’ नावाच्या एका वापरकर्त्याने (यूजर) हा व्हिडिओ 9 एप्रिल 2015 रोजी अपलोड केल्याचे दिसून येते. या व्हिडिओ उर्दू भाषेत काही तरी लिहिल्याचे आम्हाला दिसले. याचा आम्ही मराठीत अनुवाद केला. या अनुवादात म्हटले की, दुरचित्रवाणीवर अब्दुल मलिकला पाहिल्यावर एका पाकिस्तानी व्यक्तीने टीव्ही तोडला. तुम्ही हा व्हिडिओ खाली पाहू शकता.

त्यानंतर हा व्हिडिओ ‘Games Highlight’  यूजरने 27 मार्च 2016 रोजी अपलोड केल्याचे दिसून आले. या व्हिडिओच्या विवरणात लिहिले आहे की, भारताकडून पराभूत झाल्यानंतर बांगलादेशी चाहत्याची प्रतिक्रिया

ट्विटरवरही 29 एप्रिल 2015 रोजी हा व्हिडिओ Mohammed altamimi नावाच्या एका यूजरने हा शेअर केला आहे. या ट्विटमध्ये अरेबिक भाषेत लिहिले आहे की, कालच्या सामन्यानंतर एका चाहत्याची प्रतिक्रिया

ARCHIVE TWEET

या शिवाय हा व्हिडिओ आम्हाला ‘Daily Motion’ या ब्लॉगवरही दिसून आला. ‘Iffat-Javaid-CH’ नावाच्या एका ब्लॉगरने हा व्हिडिओ 23 जानेवारी 2016 रोजी शेअर केला आहे. त्यात लिहिले आहे की, पाकिस्तान विरुध्द न्यूझीलँड सामन्यानंतरची स्थिती

ARCHIVE BLOG

https://iffat-javaid-ch.skyrock.com/3268930508-Video-Dailymotion.html

या संशोधनातून एक बाब स्पष्ट झाली आहे की, या पोस्टमधील व्हिडिओ 2015 आणि त्यानंतर अनेक वेळा सोशल मीडियावर वेगवेगळ्या दाव्याद्वारे शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ 16 जून 2019 च्या भारत-पाकिस्तान विश्वचषक सामन्यानंतरचा नाही आहे.  

निष्कर्ष

पाकिस्तानी चाहत्यांचा टीव्ही फोडून जल्लोष या पोस्टमधील व्हिडिओ हा जूना असून तो वेगवेगळे दावे करत सध्या सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आताचा असल्याचा दावा फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत असत्य आढळून आला आहे.

Avatar

Title:Fact Check : पाकिस्तानी नागरिकांनी विश्वचषकातील पराभव दिसू लागल्यावर टीव्ही फोडला?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •