‘टाटा डिजिटल हेल्थ’ने होम मेडिकल किटबद्दल माहिती दिली आहे का? वाचा सत्य

False सामाजिक

कोविड मेडिकल किट घरी आवश्यक असल्याचे सांगत सध्या समाजमाध्यमात ‘टाटा डिजिटल हेल्थ’च्या नावाने काही माहिती पसरत आहे. ही माहिती खरोखरच ‘टाटा डिजिटल हेल्थ’ने दिली आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

screenshot-www.facebook.com-2020.07.21-20_14_13.png

फेसबुक पोस्ट / संग्रहित / संग्रहित

तथ्य पडताळणी

टाटा हेल्थकडून हा संदेश प्रसारित करण्यात आला आहे का, याचा शोध घेतला. त्यावेळी टाटा हेल्थने 13 जून 2020 रोजी केलेले एक ट्विट दिसून आले. उज्वल सबरवाल नावाच्या एका व्यक्तीने ट्विटरवर हा संदेश टाटा हेल्थने जारी केला आहे का, अशी विचारणा केल्याचे दिसून येते. या ट्विटला उत्तर देताना टाटा हेल्थने ही माहिती असत्य आहे. कोविड मेडिकल किटची अशी कोणतीही माहिती टाटा हेल्थकडून जारी करण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

संग्रहित

संग्रहित

त्यानंतर टाटा हेल्थने 16 जून 2020 रोजी केलेले आणखी ट्विट दिसून आले. या ट्विटमध्ये कोविड-19 विषयी कोणत्याही अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवण्यापूर्वी आपण आपल्या जवळच्या रुग्णालयातील डॉक्टरांचा अथवा ऑनलाईन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे म्हटले आहे.

संग्रहित

गरम पाण्याने कोरोना विषाणू नष्ट होतो आणि कोरोना विषाणूला पीएच मूल्य असते या बाबी असत्य असल्याचे फॅक्ट क्रेसेंडोने यापूर्वीच तथ्य पडताळणीद्वारे स्पष्ट केले आहे. हे फॅक्ट चेक मल्याळम भाषेतही आपण वाचू शकता.

निष्कर्ष

यातून हे स्पष्ट झाले की, टाटा हेल्थच्या नावाने पसरविण्यात येणारी ही माहिती असत्य आहे.

Avatar

Title:‘टाटा डिजिटल हेल्थ’ने होम मेडिकल किटबद्दल माहिती दिली आहे का? वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False