डॉ. अनिल पाटील यांचे दावे योग्य आहेत का? वाचा सत्य

Coronavirus False Medical

कोरोना विषाणूमुळे भारतीयांना कोणतीही भिती नसून या विषाणूला गांभीर्याने घेऊ नये, असे सांगणारा डॉ. अनिल पाटील यांचा एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमात चांगलाच व्हायरल होत आहे. ही मुलाखत पाहून नागरिक स्वत:कडे दुर्लक्ष करु शकत असल्याचे म्हटलं जातंय. बिइंग मराठी आदींनी ही मुलाखत पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. 

Archive

तथ्य पडताळणी

कोरोना विषाणूमुळे भारतीयांना कोणतीही भिती नसून या विषाणूला गांभीर्याने घेऊ नये, असे सांगणारी मुलाखत माय महानगरने (Archive) घेतली असल्याचे दिसून आले. डॉ. अनिल पाटील यांच्या म्हणण्यात किती तथ्य आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही शोध घेतला. त्यावेळी आम्हाला महाराष्ट्र टाईम्सने 16 मार्च 2020 रोजी दिलेले एक वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार इंडियन मेडिकल असोसिएशनने महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे याबाबत तक्रार करत हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे म्हटले आहे. इंडियम मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र कार्यकारिणीचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले की, कोरोनाविरोधात केंद्र व राज्यासह आयएमएकडूनही प्रयत्न सुरू आहेत. असे असताना मुंबईच्या डॉ. पाटील यांनी त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत करोना आजार नसल्याचा दावा करत हळदीचे दूध प्यायल्याने या पद्धतीच्या विषाणूवर फायदा होतो, असे विधान केले. इतक्यावरच ते थांबले नाहीत. गोमूत्र-शेणात ‘अॅण्टी ऑक्सिडंट’सह इतर घटक असल्याने त्याचा रुग्णांना लाभ होतो, करोनासह इतर विषाणू 35 अंश सेल्सिअस तापमानात राहू शकत नाहीत, कोणतेही विषाणू झाल्यास कोमट पाण्यात मीठ टाकून प्यायल्याने ते नाहीसे होतात, यांसह इतरही अनेक बेजबाबदार दावे केले आहेत. या प्रकारच्या पोस्टने नागरिकांत संभ्रमावस्था निर्माण होऊ शकते. त्यामुळे याविरोधात एमएमसीकडे दाद मागितली आहे. 

screenshot-maharashtratimes.indiatimes.com-2020.03.17-16_28_21.png

महाराष्ट्र टाईम्सचे मुळ वृत्त / Archive 

मुंबई मिररने 17 मार्च 2017 रोजी दिलेल्या वृत्तानुसार डॉ. अनिल पाटील यांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने नोटीस बजावली आहे. त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्यास त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यांनी केलेले दावे हे राज्य आणि केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांना धरुन नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

screenshot-mumbaimirror.indiatimes.com-2020.03.17-16_47_48.png

मुंबई मिररचे वृत्त / Archive

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेली माहितीही डॉ. अनिल पाटील यांनी केलेल्या दाव्यांना दुजोरा देत असल्याचे दिसून येत नाही. हळदीमुळे कोरोना विषाणू प्रतिबंध होत असल्याचा दाव्यावरही जागतिक आरोग्य संघटनेने (Archive) असा शास्त्रीय पुरावा आढळला नसल्याचे म्हटले आहे. 

निष्कर्ष

कोरोना विषाणूबाबत डॉ. अनिल पाटील यांनी केलेले दावे दिशाभूल करणारे असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनने म्हटले आहे. त्याबद्दल त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

Avatar

Title:डॉ. अनिल पाटील यांचे दावे योग्य आहेत का? वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False