आलिशान संपत्तीचे व्हायरल फोटो कुवैतमधील अब्जाधीशाचे नाहीत; वाचा सत्य

False आंतरराष्ट्रीय | International

सोन्याचे विमान, सोन्याचा पलंग, नोटांचा ढीग, हिऱ्यांनी मढवलेला जिना आणि मातीच्या कबरीचा फोटो शेअर करून दावा केला जात आहेत की, इतक्या अफाट संपत्तीचा मालक असलेला कुवैतमधील अब्जाधीश शेवटी रिकाम्या हातानेच जग सोडून गेला. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. 

पडताळणीअंती कळाले की, इंटरनेटवरील एकमेकांशी काहीही संबंध नसलेले फोटो खोट्या माहितीसह शेअर केले जात आहेत.

काय आहे दावा?

व्हायरल फोटोसोबत लिहिलेले आहे की, “कुवेतचे अब्जाधीश नासिर अल-खराफी यांची संपत्ती, जी त्यांनी त्यांच्या मृत्यूनंतर सोडली. शेवटचा फोटो नीट बघावा.”

मूळ पोस्ट – फेसबुक 

तथ्य पडताळणी

व्हायरल पोस्टमधील फोटोंची एक-एक करीत पडताळणी करुया. 

फोटो क्र. 1 

हिऱ्यांनी माढवलेला तो जिना एमएससी नामक आलिशान क्रुझवरील आहे. काच आणि क्रिस्टलसाठी प्रसिद्ध असलेल्या SWAROVSKI कंपनीने तो तयार केलाला आहे. याविषयी अधिक माहिती आपण एमएससी क्रुझच्या अधिकृत वेबसाईटवर वाचू शकता. तसेच खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये हा जिना पाहू शकता. 

फोटो क्र. 2

हे Dassault Falcon 900B नावाचे विमान आहे. आझरबैजान येथील व्यावसायिक Telman Izmailov त्याचे मालक आहेत. 

संदर्भ – Air Liners

फोटो क्र. 3 

गोल्ड क्रोमचा कोट असलेली ही रोल्स रॉईल ड्रॉपहेड कार आहे. चित्रपट निर्माता व अभिनेता स्टीव्ह गोल्डफिल्ड यांची ती कार आहे. 

संदर्भ – Wrap Folio

फोटो क्र. 4

ही खलिलाह (Khalilah) नावाची आलिशान यॉट आहे. ती भाडेतत्वावर उपलब्ध आहे.

संदर्भ – Yacht Charter Fleet

फोटो क्र. 5

ड्रग्सची तस्करी करणाऱ्या Zhenli Ye Gon नामक व्यावसायिकाच्या घरातून अमेरिकन पोलिसांनी 2007 साली सुमारे 205 मिलियन डॉलर रकमेची रोकड जप्त केली होती. हा त्याचा फोटो आहे.

संदर्भ – AFP

फोटो क्र. 6

बँक ऑफ इंग्लंडमध्ये ठेवलेल्या सोन्याचा हा फोटो आहे. 

संदर्भ – The Guardian

कुवैतमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण?

कुवैतमध्ये Nasser Al-Kharafi या नावाची एक व्यक्ती होती. 2011 साली त्यांचा मृत्यू झाला. फोर्ब्सने दिलेल्या बातमीनुसार, त्यांची संपत्ती 10 बिलियन डॉलर्स इतकी होती. फोर्ब्सच्या 2011 मधील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत ते 77 व्या स्थानावर होते.

मूळ पोस्ट – कुवैत टाईम्स

Kutayba Alghanim सध्या कुवैतमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. फोर्ब्सच्या 2020 मधील यादीनुसार ते जगातील 1613 क्रमांचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. 

मूळ वेबसाईट – फोर्ब्स

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, इंटरनेटवरील असंबंधित फोटो चुकीच्या माहितीसह शेअर केले जात आहेत. आलिशान मालमत्तेचे हे फोटो कुवैतमधील अब्जाधीश नासिर अल-खराफी यांच्या संपत्तीचे नाहीत. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:आलिशान संपत्तीचे व्हायरल फोटो कुवैतमधील अब्जाधीशाचे नाहीत; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False