प्रत्येक कोरोना रूग्णामागे महापालिका, नगरपालिकेला दीड लाख रूपये मिळतात ही अफवा; वाचा सत्य

Coronavirus False सामाजिक

प्रत्येक कोरोना रूग्णामागे दीड लाख रूपये खर्च म्हणून महापालिका, नगरपालिकांना देण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आले, अशी माहिती असलेला संदेश सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. 

या संदेशाची फॅक्ट क्रेसेंडो ने तथ्य पडताळणी केली असता ही माहिती खोटी असल्याचे निष्पन्न झाले.

काय आहे पोस्टमध्ये?

2.png

फेसबुक पोस्ट / संग्रहित

तथ्य पडताळणी

प्रत्येक कोरोना रूग्णामागे दीड लाख रूपये खर्च म्हणून महापालिका, नगरपालिकांना देण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे का, याचा शोध घेतला. त्यावेळी आकाशवाणीने 25 जानेवारी 2020 रोजी दिलेले एक वृत्त दिलेले दिसून आले. या वृत्तानुसार कोरोनाबाधितांमागे केंद्र सरकारकडून दीड लाख खर्च मिळत असल्याचा मेसेज चुकीचा आहे. 

screenshot-newsonair.com-2020.07.27-21_04_47.png

आकाशवाणीच्या संकेतस्थळावरील वृत्त / संग्रहित

त्यानंतर दैनिक सामनाच्या संकेतस्थळावर 25 जुलै 2020 रोजी प्रसिध्द झालेले वृत्त दिसून आले. या वृत्तात प्रत्येक कोरोना रूग्णामागे दीड लाख रूपये खर्च मिळतो ही निव्वळ अफवा समाजमाध्यमात पसरविण्यात आली आहे. अशा प्रकारचे सरकारने काहीही जाहीर केले नसून या अफवा पसरविण्यांविरोधात कडक कारवाईचा इशारा पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदेंनी दिल्याचे म्हटले आहे. 

screenshot-www.saamana.com-2020.07.27-21_15_01.png

सामना / संग्रहित

screenshot-rajtantra.com-2020.07.27-17_14_42.png

त्यानंतर दैनिक राजतंत्रच्या संकेतस्थळावर 23 जुलै 2020 रोजी प्रसिध्द झालेले एक वृत्त दिसून आले. या वृत्तात पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी नेमके काय म्हटले आहे, याची माहिती देण्यात आली आहे.

दैनिक राजतंत्र / संग्रहित

पालघरचे जिल्हा माहिती अधिकारी राहुल भालेराव यांनी देखील ही अफवा असल्याचे स्पष्ट केले. 

निष्कर्ष 

कोरोना रूग्णामागे महापालिका, नगरपालिकांना दीड लाख रूपये मिळतात, ही माहिती असत्य असून अफवा असल्याचे पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

Avatar

Title:प्रत्येक कोरोना रूग्णामागे महापालिका, नगरपालिकेला दीड लाख रूपये मिळतात ही अफवा; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False