अक्कलकुवा-अंकलेश्वर रोडवरील पूल पूरात वाहून जातानाचा हा व्हिडिओ नाही; तो तर जम्मुचा

False नैसर्गिक आपत्ती

राज्यात मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. धुळे जिह्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अशातच एक पूल कोसळतानाचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, अक्कलकुवा आणि अंकलेश्वर रोडवरील पूल पूराच्या पाण्यात वाहून गेला. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ धुळे जिल्ह्यातील नसून, जम्मू-काश्मीरमधील आहे.

काय आहे दावा?

30 सेंकदाच्या व्हिडिओमध्ये पूलाचा एक भाग पाण्यात कोसळताना दिसतो. सोबत कॅप्शनमध्ये म्हटले की, हा व्हिडिओ अक्कलकुवा आणि अंकलेश्वर रोडवरील पुलाचा आहे.

मूळ पोस्ट – फेसबुकफेसुबक

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम या व्हिडिओतील कीफ्रेम्सला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हा व्हिडिओ महाराष्ट्रातील तर नाहीच, पण यंदाचाही नाही.

ANI वृत्तसंस्थेने 26 ऑगस्ट 2020 रोजी हाच व्हिडिओ शेअर करून बातमी दिली होती की, जम्मू येथील गडीगढ भागातील एका नदीवरील पुलाचा भाग कोसळला.

जम्मू-काश्मीरमधील तावी नदीला मुसळधार पावसामुळे पूर आला होता. प्रवाह इतका वेगवान होता की, या पुलाचा अर्धा भाग कोसळून पाण्यासोबत वाहून गेला. 

2020 साली जम्मू-काश्मीरमध्ये पावासाने थैमान घातले होते. अनके ठिकाणी पूर, दरड कोसळणे, भूस्खलन झाले होते.

धुळ्यात काय परिस्थिती आहे?

साम टीव्हीच्या 13 जुलै रोजीच्या बातमीनुसार, साक्री तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर पिंपळनेर येथील बल्हाने-पारगाव रस्त्यावरील फरशी पूल वाहून गेला. गुटकळ नदीवरील पूल देखील वाहून गेल्याने चार ते पाच गावांचा संपर्क तुटला आहे.

निष्कर्ष

यावरुन स्पष्ट होते की, पूल कोसळतानाचा हा व्हिडिओ अक्कलकुवा-अंकलेश्वर पूल नाही. हा व्हिडिओ जम्मू-काश्मीरमधील आहे. 2020 साली तेथील गडीगढ येथील तावी नदीवरील पूल पूरात वाहून गेला होता. जुना व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह व्हायरल होत आहे. 

(तुमच्याकडेदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर त्यांची सत्यता जाणून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. आमचे लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर वर फॉलो करा.)

Avatar

Title:अक्कलकुवा-अंकलेश्वर रोडवरील पूल पूरात वाहून जातानाचा हा व्हिडिओ नाही; तो तर जम्मुचा

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False