नरेंद्र मोदी यांचे सौदी अरेबिया दौऱ्यातील फोटोशॉप केलेले फोटो व्हायरल. पाहा खरं काय आहे

False राजकीय

पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 ऑक्टोबर रोजी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर गेले होते. तेथील विमानतळावर मोदींचे स्वागत करण्यात आले होते. यावेळी मोदी यांनी सौदी अरेबियातील पारंपरिक ‘केफिये’ नावाचे हेडगेयर घातलेले फोटो सोशल मीडियावर शेयर केले जात आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोंची तथ्य पडताळणी केली.

काय आहे पोस्टमध्ये?

पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पारंपरिक केफिये नावाचे हेडगेयर घातलेला फोटो शेयर करून लिहिले की, वल्लाह हबीबी अंबानीच्या तेल कंपनीसाठी काहीपण करायला तयार आहे.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक

तथ्य पडताळणी

नरेंद्र मोदींच्या सौदी अरेबिया दौऱ्यातील हे फोटो आहेत. म्हणजे पंतप्रधान आणि त्यांच्या कार्यालयाकडून ते प्रसिद्ध करण्यात आले असतील. नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान कार्यालयाच्या (PMO) अधिकृत ट्विटर अकाउंट तपासले. तेव्हा खालील फोटो आणि व्हिडियो आढळला.

नरेंद्र मोदी यांच्या ट्विटटर अकाउंटवर ते रियाध येथे विमानतळावर पोहोचल्याचे फोटो शेयर करण्यात आले होते. रियाधचे गव्हर्नर प्रिन्स फैसल बिन बंदार अल-सौद यांनी त्यांचे स्वागत केले. ट्विटमधील फोटोमध्ये मोदी यांनी पारंपरिक केफिय हेडगेयर परिधान केलेले नाही.

अर्काइव्ह

पंतप्रधान कार्यालयानेसुद्धा या स्वागत सोहळ्याचे फोटो शेयर केले होते. ते तुम्ही खाली पाहू शकता. यामध्येसुद्धा मोदींनी कोणतीही पारंपरिक वस्त्रे घातलेली नाहीत.

अर्काइव्ह

नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाउंटवरून मोदी विमानातून बाहेर उतरत असतानाचा व्हिडियोदेखील आहे. यामध्येसुद्धा पाहू शकता की, त्यांच्या डोक्यावर कोणतेही पारंपरिक हेडगेयर नाही.

अर्काइव्ह

खाली फेसबुक पोस्टमधील फोटो आणि मूळ फोटो यांची तुलना केलेली आहे. यावरून स्पष्ट होते की, मूळ फोटोला फोटोशॉप करून एडिट करण्यात आले आहे.

निष्कर्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सौदी अरेबिया दौऱ्यातील छायाचित्रांना फोटोशॉपद्वारे एडिट करून पसरविण्यात येत आहे. त्यामुळे सदरील पोस्ट खोटी आहे.

Avatar

Title:नरेंद्र मोदी यांचे सौदी अरेबिया दौऱ्यातील फोटोशॉप केलेले फोटो व्हायरल. पाहा खरं काय आहे

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False