दिल्लीतील स्थलांतरित मजूरांचा व्हिडिओ विविध ठिकाणांचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य

Coronavirus False सामाजिक

देशभरातील लॉकडाऊननंतर स्थलांतरित मजूरांचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यातच समाजमाध्यमात सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत असून तो मुंबई, ठाणे, पनवेल, सुरतमधील असल्याचा दावा करण्यात येत आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

फेसबुक / अक्राईव्ह

तथ्य पडताळणी

स्थलांतरित मजूरांचा हा व्हिडिओ कोणत्या शहरातील आहे, याचा शोध घेतला. त्यावेळी नेमका तो व्हिडिओ आम्हाला मिळाला नाही मात्र नेटवर्क 18 ने 28 मार्च 2020 रोजी दिलेले एक वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार देशभरात लॉकडाऊननंतर स्थलांतरित मजूरांचा मोठा प्रश्न समोर आला आहे. दिल्लीतील आनंद विहार येथे गावी परत जाण्यासाठी हजारो जण जमा झाले होते. यातील काही दृश्ये ही व्हायरल होत असलेल्या व्हिडिओशी जुळत असल्याचे दिसून आले. 

अक्राईव्ह

2020-05-15.png

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतील आणि नेटवर्क 18  ने दिलेल्या वृत्तातील समान द्दश्यातील तुलनात्मकता खाली दर्शविण्यात आली आहे.

याव्यतिरिक्त गिट्टी इमेजसवर 28 मार्च 2020 रोजी याबाबतचे एक छायाचित्र प्रसिध्द झाले आहे. हे छायाचित्रही व्हिडिओतील द्दश्यांशी मिळते जुळते असून यात हे स्थलांतरित मजूर दिल्लीतील आनंद विहार बसस्थानकाकडे जात असल्याचे छायाचित्रासोबत असलेल्या ओळीत म्हटले आहे. पत्रकार शाहिद सिद्दीकी यांनीही अशाच स्वरुपाचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. त्याला उत्तर देताना एकाने हा सध्या महाराष्ट्राच्या नावाने व्हायरल होत असल्याचे म्हटले आहे.

अक्राईव्ह

निष्कर्ष

महाराष्ट्रात आणि गुजरातमधील स्थलांतरित मजूरांचा म्हणून व्हायरल होत असलेला व्हिडिओ दिल्लीतील आनंद विहार येथील आहे. तो महाराष्ट्रातील अथवा गुजरातमधील असल्याचा दावा असत्य आहे.

(फॅक्ट क्रेसेंडो मराठी आता टेलीग्रामवरसुद्धा ! आमच्या चॅनेलला जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.)

Avatar

Title:दिल्लीतील स्थलांतरित मजूरांचा व्हिडिओ विविध ठिकाणांचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False