नरेंद्र मोदी यांनी रामनाथ कोविंद यांच्याकडे दुर्लक्ष करून अपमान केला का? एडिट केलेला व्हिडिओ व्हायरल

Missing Context राजकीय | Political

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे निरोप समारंभात दुर्लक्ष करून त्यांचा अपमान केला, असा दावा केला जात आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये रामनाथ कोविंद हाथ जोडून सर्वांना अभिवादन करताना दिसतात. त्याचवेळी नरेंद्र मोदी त्यांच्याकडे न पाहता छायाचित्रकारांकडे पाहत आहेत, असे दिसते. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ अर्धवट आहे. नरेंद्र मोदी यांनी कोविंद यांना हाथ जोडून अभिवादन केले होते. 

तथ्य पडताळणी

व्हायरल व्हिडिओसोबत म्हटले की, “किती भयानक विकृती असेल ही. खुद्द राष्ट्रपती अभिवादन करत असताना चमकेश पंतप्रधान आपल्या फोटोची पोज देण्यात गुंग आहेत. अरे जरा संविधानिक पदांचा तरी मान राखा.”

मूळ पोस्ट – फेसबुकइन्स्टाग्राम

तथ्य पडताळणी

23 जुलै रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा निरोप समारंभ होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व मंत्रीमंडळ उपस्थित होते. 

संसद टीव्हीच्या युट्यूब चॅनेलवर या समारोहाचा व्हिडिओ उपलब्ध आहे. व्हिडिओ पाहिल्यावर कळते की, कोविंद यांनी प्रत्येकाला हाथ जोडून नमस्कार केला. 

नरेंद्र मोदी यांनीसुद्ध कोविंद त्यांच्यापाशी आले तेव्हा हाथ जोडून अभिवादन केले. खाली दिलेल्या व्हिडिओच्या 57 व्या सेकंदापासून तुम्ही पाहू शकता.

राष्ट्रपतीच्या ट्विटर अकाउंटवरूनदेखील या समारोहाचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. त्यात स्पष्टपणे दिसते की, नरेंद्र मोदी आणि रामनाथ कोविंद एकमेकांना अभिवादन करत आहेत.

मूळ फोटो – ट्विटर

म्हणजेच मूळ व्हिडिओला एडिट करून अर्धवट क्लिप व्हायरल केली जात आहे. ज्या अँगलने हा व्हिडिओ चित्रित करण्यात आला आहे त्यावरून असे दिसते की कोविंद मोदींच्या समोर उभे आहेत आणि मोदी त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. परंतु, कोविंद त्यांच्या पुढून समोर आलेले आहेत. कोविंद पियुष गोयल यांच्याकडे पाहत आहेत, नरेंद्र मोदी यांच्याकडे नाही.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती कोविंद यांना हाथ जोडून अभिवादन केले होते. अर्धवट क्लिप शेअर करून चुकीचा दावा केला जात आहे की, त्यांनी राष्ट्रपतींचा अपमान केला. 

(तुमच्याकडेदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर त्यांची सत्यता जाणून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. आमचे लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर वर फॉलो करा.)

Avatar

Title:नरेंद्र मोदी यांनी रामनाथ कोविंद यांच्याकडे दुर्लक्ष करून अपमान केला का? एडिट केलेला व्हिडिओ व्हायरल

Fact Check By: Agastya Deokar 

Result: Missing Context