दोन महिला वकिलांच्या भांडणाचा व्हिडिओ महाराष्ट्रातील नाही; तो तर उत्तर प्रदेशमधील आहे

False Social

न्यायालय परिसरात महिला वकिलांच्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोबत दावा केला जात आहे की, ही घटना महाराष्ट्रातील असून, महिला न्यायाधीशाने सदरील महिला वकिलाच्या होणाऱ्या पतीला जामीन नाकारला म्हणून या दोघींमध्ये हाणामारी झाली. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. 

पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ महाराष्ट्रातील नसून, उत्तर प्रदेशमधील एका न्यायालयात घडलेल्या घटनेचा आहे.

काय आहे दावा?

व्हायरल क्लिपमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी होताना दिसते. शेवटी महिला पोलिस हस्तक्षेप करून भांडण थांबावतात. 

हा व्हिडिओ शेअर करून युजर्स लिहितात की, भारतात पहिल्यांदाचा एक महिला न्यायाधीश आणि महिला वकिल यांच्यामध्ये महाराष्ट्रातील एका कोर्टात हाणामारी झाली. न्यायाधाशाने महिला वकिलाच्या होणाऱ्या नवऱ्याला जामीन मंजूर केला नाही म्हणून हे भांडण झाले.

मूळ पोस्ट – फेसबुक 

तथ्य पडताळणी

कीवर्डद्वारे सर्च केल्यावर कळाले की, हा व्हिडिओ महाराष्ट्रातील नाही. 

नवभारत टाईम्सच्या युट्यूब चॅनेलवर 28 ऑक्टोबर 2022 रोजी हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. सोबतच्या बातमीनुसार, उत्तर प्रदेशमधील कासगंज न्यायालयामध्ये ही घटना घडली होती. दोन्हा महिला वकिलांमध्ये एका केसवरून वाद झाला आणि त्याचे रुपांतर हाणामारीत झाले होते. 

कासंगज पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, या दोन्ही महिला वकिलांची नावे योग्यता सक्सेना आणि सुनीता कौशिक आहे. पैकी योग्यता सक्सेना कासगंज येथील कोर्टात वकिल असून, सुनीत कौशिक अलिगढ येथील प्रक्टिस करतात. 

या दोघी एका जोडप्याच्या केससाठी 27 ऑक्टोबर रोजी कासंगज न्यायालयात आल्या होत्या. तेथे दोघांमध्ये वादावादीतून भांडण वाढत गेले. या प्रकरणी योग्यता सक्सेना यांनी सुनीता कौशिक यांच्याविरोधा तक्रार दिली होती. 

या भांडणाचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर कासगंज पोलिसांनी ट्विटरवर माहिती दिली होती की, या प्रकरणी संबंधित कलमांच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, वकिलांच्या भांडणांचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील नाही. ही घटना उत्तरप्रदेशमधील कासगंज येथील कोर्टातील आहे. चुकीच्या माहितीसह दोन महिन्यांपूर्वीचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:दोन महिला वकिलांच्या भांडणाचा व्हिडिओ महाराष्ट्रातील नाही; तो तर उत्तर प्रदेशमधील आहे

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False