इस्रायलने मृत भारतीय नर्स सौम्या यांचे नाव लढाऊ विमानाला दिले का? वाचा सत्य

False आंतरराष्ट्रीय | International

इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील संघर्षामध्ये एका भारतीय नर्सचा मृत्यू झाला. मूळच्या केरळमधील या नर्सचे नाव सौम्या होते. 

सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, तिला अनोखी श्रद्धांजली देण्यासाठी इस्रायलने त्यांच्या लढाऊ विमानांना सौम्या यांचे नाव दिले. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी याबाबत आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा दावा खोटा आहे.

तथ्य पडताळणी

व्हायरल पोस्टमध्ये SOUMYA असे नाव असलेल्या लढाऊ विमानाचा फोटो शेअर करून म्हटले की, “इस्रायलने सौम्याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आपल्या फायटर जेटचे नाव सौम्या ठेवले आणि हमासवर केलेल्या भीषण एअर स्ट्राईकमध्ये या जेटला इतर जेट सोबत समाविष्ट करून तिथे शत्रूंची धूळधाण उडवून सौम्याला न भुतो अशी श्रध्दांजली वाहिली.”

फेसबुक | अर्काइव्ह

तथ्य पडताळणी

इस्रायलने विमानाला सौम्या यांचे नावा देण्याचा काही निर्णय घेतला का याचा शोध घेतला. तेव्हा अशी कुठलीही माहिती समोर आली नाही. 

त्यानंतर पोस्टमधील फोटी पडताळणी केली. रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हा फोटो एडिट केलेला आहे. विमानाचा हा फोटो इस्रायलमधील नसून, चीनमधील आहे.

पीपीटी न्यूज नावाच्या एका चीनी वेबसाईटवर 2 एप्रिल 2020 रोजी अपलोड करण्यात आलेला फोटो आढळला. हा फोटो आणि सध्या व्हायरल होत असलेल्या फोटो एकच आहे.

हाच फोटो क्यूक्यू वेबसाईटवरदेखील उपलब्ध आहे. 

मूळ वेबसाईट – पीपीटी न्यूजअर्काइव्ह

वेबसाईटवरील माहितीनुसार हे Chengdu J-10 नावाचे फायटर जेट आहे. चीनच्या कंपनीने हे विमान चीनी हवाई दलासाठी विकसित केलेले आहे. 

मूळ फोटोमध्ये आपण पाहू शकता की, त्यावर SOUMYA असे नाव लिहिलेले नाही. कोणी तरी ते एटिड करून बनावट फोटो तयार केला आहे.

निष्कर्ष

यावरून हे स्पष्ट होते की, “इस्रायलने नर्स सौम्या यांचे नाव लढाऊ विमानाला दिले” हा दावा खोटा आहे. एका चीनी विमानाच्या फोटोला एडिट करून चुकीच्या माहितीसह फिरवण्यात येत आहे.

Avatar

Title:इस्रायलने मृत भारतीय नर्स सौम्या यांचे नाव लढाऊ विमानाला दिले का? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False