Fact Check : विष्णूची ही मुर्ती 1300 वर्ष पाण्यात तरंगत आहे का?

False सामाजिक

*गेली १३०० वर्षे पाण्यावर तरंगत असलेला हा श्री भगवान विष्णूंचा १४ फुटी दगडी पुतळा.* श्री अश्विन दिक्षीत यांनी ‘गुगल’ वर ह्याची सत्यता पडताळून पोस्ट पाठवली आहे. काठमांडूपासून ९ कि.मी.अंतरावर असलेल्या ‘बुद्धनिकंध’ या गावी हे देऊळ आहे. एवढा मोठा एकसंध दगडी पुतळा गेली १३०० वर्षे पाण्यावर तरंगतो आहे हा ईश्वरी चमत्कारच! Forwarded, अशी माहिती Manjusha Kale Oak यांनी Shri Gondavalekar Maharaj/श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज या ग्रुपवर पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

फेसबुक / Archive 

तथ्य पडताळणी 

नेपाळमध्ये गेली १३०० वर्षे पाण्यावर तरंगत असलेला हा श्री भगवान विष्णूंचा १४ फुटी दगडी पुतळा आहे का? हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यावेळी विकीपीडियावर आम्हाला याबाबतची माहिती दिसून आली. त्यानंतर आम्हाला युटूयूबवर खालील व्हिडिओ दिसून आला.

भगवान विष्णूची ही मूर्ती तरंगत नाही. ती जमिनीपासून काही फूट अंतरावर सापासारख्या खडकाच्या आकारावर वसलेली आहे. 2 ते 3 फूट पाण्याचा तलाव भरला की पुतळा तरंगताना दिसतो. सर्वात लहान तलावातील पाणी काढून टाकले जाते आणि पूजा केली जाते. खालील फोटोत ही बाब दिसत आहे.

याव्यतिरिक्त आपण अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे आणि येथे क्लिक करा.

काही जण असे म्हणतात की ज्वालामुखीच्या खडकापासून ही मुर्ती बनली असल्याने पाण्यावर तरंगते, पण ही बाबही असत्य आढळली आहे. विष्णू सहस्त्रनागावर पाण्यावर तरंगण्याचे दृश्य तलाव पाण्याने भरल्यावरच साकारते हे यातून स्पष्ट होत आहे.  

निष्कर्ष  

नेपाळमधील विष्णूची मुर्ती तरंगत असल्याचे हे दृश्य साकारण्यात येते. ही मुर्ती 1300 वर्षे पाण्यावर तरंगत आहे, ही बाब फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत असत्य आढळून आली आहे.

Avatar

Title:Fact Check : विष्णूची ही मुर्ती 1300 वर्ष पाण्यात तरंगत आहे का?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False