गरम पाण्याच्या वाफेने कोरोना नष्ट होतो का? वाचा सत्य

Coronavirus False Medical
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

गरम पाण्याची वाफ करून ती नाकाने किंवा तोंडाने आत घेतल्यास कोरोना 100 टक्के नष्ट होतो, असा दावा सध्या समाजमाध्यमात करण्यात येत आहे. ही माहिती सर्वांना पाठवा, असे आवाहनही हे दावे करणारे करत आहेत. या दाव्यात किती तथ्य आहे, याची पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

screenshot-www.facebook.com-2020.07.10-19_22_55.png

फेसबुक पोस्ट / संग्रहित

तथ्य पडताळणी

गरम पाण्याची वाफ करून ती नाकाने किंवा तोंडाने आत घेतल्यास कोरोना नष्ट होतो का, याचा शोध घेतला. त्यावेळी अमेरिकेच्या सेन्टर फॉर रेस्टॉरंट्स कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेंशन या संस्थेने गरम पाण्याच्या वाफेच्या वापराबाबत दिलेली खालील माहिती दिसून आली या माहितीनुसार केवळ सामान्य सर्दीपासूनच गरम पाण्याची वाफ आपले संरक्षण करण्यास मदत करते. 

screenshot-odia.factcrescendo.com-2020.07.10-20_18_55.png

सीडीसीचे संकेतस्थळ / संग्रहित

त्यानंतर पत्र सुचना कार्यालयाच्या ट्विटर खात्यावरील एक ट्विट दिसून आले. या ट्विटनुसार गरम पाण्याच्या वाफेने कोरोना मरतो, या विधानाला कोणताही शास्त्रीय आधार नसल्याचे म्हटले आहे. वारंवार हात धुणे आणि सामाजिक अंतर राखणे हे उपाय कोरोना विषाणूची लागण होण्यापासून आपला बचाव करु शकतात, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे.

संग्रहित 

अपोलो हॉस्पीटलच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसारही गरम पाण्याच्या वाफेने कोरोना नष्ट होतो, याचा कोणताही पुरावा आढळलेला नाही. यामुळे श्वसनमार्ग मोकळा होण्यास मदत होऊ शकते पण त्याचबरोबर गरम पाण्यामुळे भाजण्याचा धोकाही असतो.

screenshot-odia.factcrescendo.com-2020.07.10-20_37_31.png

अपोलो रुग्णालयाचे संकेतस्थळ / संग्रहित

निष्कर्ष

गरम पाण्याच्या वाफेने कोरोना नष्ट होत असल्याचा कोणताही शास्त्रीय पुरावा आढळत नाही. त्यामुळे ही बाब असत्य असल्याचे सिद्ध होते.

Avatar

Title:गरम पाण्याच्या वाफेने कोरोना नष्ट होतो का? वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •