Fact Check : दिल्लीतील शाळांमध्ये ऑनलाईन हजेरीची ही प्रणाली आहे का?

False आंतरराष्ट्रीय | International राजकीय | Political

पाल्याची काळजी ही पालकांना नेहमीच असते. लहान मुलांच्या या काळजीतुनच सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ पसरत आहे. दिल्लीतील शाळांमध्ये हजेरी लावताच पालकांना मेसेज येत असल्याचा दावा या व्हिडिओसोबत करण्यात आला आहे. जितेंद्र किरडाकुडे आणि दीक्षित सुमित यांनी अशाच माहितीसोबत हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

फेसबुकवरील मुळ पोस्ट / Archive

तथ्य पडताळणी 

आम्ही वेगवेगळे शब्दप्रयोग करत हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी युटूयूबवर मीडिया बॉक्स चॅनलद्वारे एक व्हिडिओ अपलोड करण्यात आल्याचे दिसून आले. या व्हिडिओखाली इंग्रजीत Online Attendance System with SMS Alert to parents in Pakistan  असे लिहिले असल्याचे दिसून आले. हा व्हिडिओ पाकिस्तानमधील शाळेचा असल्याचा दावा व्हिडिओ अपलोड करणाऱ्याने केल्याचे दिसून आले. 

Archive

त्यानंतर आम्ही आमचा तपास आणखी पुढे नेला असता आम्हाला People Magazine Pakistan नावाचे एक फेसबुक पेज सापडले. हा व्हिडिओ 1 ऑगस्ट 2019 रोजी अपलोड करण्यात आल्याचे दिसून आले. हा व्हिडिओ आपण खाली पाहू शकता. 

Facebook Post / Archive

त्यानंतर आम्ही आमचा तपास पुढे नेला त्यावेळी असे दिसून आले की अनेक पाकिस्तानी नागरिकांनी हा व्हिडिओ आपल्या फेसबुक खात्यावर अपलोड केलेला आहे. यापैकी Bilal Keyani नावाच्या फेसबुक अकाऊंटवरुन लेडीज स्कूल सिस्टीमला टॅग केल्याचे दिसून येते. त्यांच्या वैयक्तिक माहितीत ते या शाळेचे संचालक असल्याचेही दिसून येते.

screenshot-www.facebook.com-2019.11.23-21_01_38.png

Archive

याव्यतिरिक्त हा व्हिडिओ 31 जुलै 2019 रोजी पाकिस्तानमधील रावळपिंडी येथील लेडीज स्कूल फेसबुक पेजवर देखील अपलोड करण्यात आलेला आहे. 

Facebook Post | Archive

या संशोधनातून ही बाब पुरेशी स्पष्ट झाली की हा व्हिडिओ दिल्लीतील शाळेचा नसून पाकिस्तानमधील रावळपिंडीच्या शाळेचा आहे.

निष्कर्ष

समाजमाध्यमात दिल्लीतील शाळेचा म्हणून पसरत असलेला व्हिडिओ हा दिल्लीतील शाळेचा नसून पाकिस्तानमधील रावळपिंडी येथील शाळेचा आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:Fact Check : दिल्लीतील शाळांमध्ये ऑनलाईन हजेरीची ही प्रणाली आहे का?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False