अभूतपूर्व ट्राफिक जॅमचा तो व्हिडिओ चिपळूण घाटातील नाही; तो पाकिस्तानचा आहे

False सामाजिक

घाटातील रस्त्यावर हजारो वाहने अडकून पडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोबत दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळून घाटातील ट्रॅफिक जॅमचा आहे. तसेच हाच व्हिडिओ हिमाचल प्रदेशमधील म्हणूनसुद्धा व्हायरल झालेला आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ ना चिपळून घाटातील आहे, ना हिमाचल प्रदेशमधील. हा व्हिडिओ पाकिस्तानातील ट्राफिक जामचा आहे.

काय आहे दावा?

व्हायरल व्हिडिओमध्ये घाटात दुरवर वाहनांची रांग लागल्याचे दिसते. सोबत कॅप्शनमध्ये म्हटले की, “मुंबई गोवा मार्गावरील चिपळूण घाटामधील रस्ता ड्रोन द्वारे टिपलेले चित्र.”

मूळ पोस्ट – फेसबुक

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम व्हिडिओतील कीफ्रेम निवडून गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून युट्युबवर अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केल्याचे आढळले. बहुतांश अकाउंटवर हा व्हिडिओ पाकिस्तानातील कघन खोरे भागातील असल्याचे म्हटले आहे.

“Heavy Traffic Jam in Naran And Kaghan Valley” असे या व्हिडिओचे नाव आहे.

हा धागा पकडून स्थानिक बातम्यांचा शोध घेतला. त्यातून कळाले की, पाकिस्तानच्या कघन खोऱ्यामध्ये खरंच रविवारी (25 जुलै) असे अभूतपूर्व ट्राफिक जाम झाले होते. 

24 डिजील न्यूज नावाच्या वेबसाईटवरील बातमीनुसार, ईदउल अजाह सणानिमित्त हजारो पर्यटकांनी कघन खोऱ्यामध्ये गर्दी केली होती. त्यामुळे रस्त्यावर असे ट्राफिक वाढले आणि वाहने अडकून पडली.

डॉन वर्तमानपत्रानुसार, ईदच्या सुट्टीच्या काळात अंदाजे सात लाख वाहनांनी या भागाला भेट दिली होती. त्यामुळे गिलगीत-बलिस्तानकडे जाणाऱ्या मनसेहरा-नारन-जलखद रस्त्यावर कघन खोऱ्यामध्ये रविवारी अशी कोंडी झाली. 

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नुकतेच कघन खोऱ्याची स्तुती करताना म्हटले होते की, स्वर्गमय हे ठिकाण स्वित्झर्लंडपेक्षाही सुंदर आहे. त्यानंतर या भागाकडे पर्यटकांचा ओढा वाढला आहे.

या ट्रॅफिक जामचा वेगळा व्हिडिओ तुम्ही खाली पाहू शकता. 

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, अभूतपूर्व अशा या वाहतूक कोंडीचा व्हिडिओ चिपळूण घाटातील नाही. हा व्हिडिओ पाकिस्तानातील कघन खोऱ्यातील आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:अभूतपूर्व ट्राफिक जॅमचा तो व्हिडिओ चिपळूण घाटातील नाही; तो पाकिस्तानचा आहे

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False