सत्य पडताळणी : तींत्रव गावात वंचित बहुजन आघाडीशिवाय इतरांना प्रचारास बंदी?

False

ग्रामपंचायत तींत्रव गावामध्ये वंचित बहुजन आघाडीशिवाय कोणीही प्रचारास येऊ नये, नाहीतर गावामधून कपडे काढून हाणले जाईल, अशी पोस्ट सोशल सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

आक्राईव्ह लिंक

तथ्य पडताळणी

तींत्रव नावाचे गाव महाराष्ट्रात खरेच अस्तित्वात आहे का? याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. हे गाव बुलडाणा जिल्ह्यातील शेगांव तालुक्यात असल्याचे आम्हाला दिसून आले.

तींत्रव गावाविषयी माहिती

फोटो फॉरेन्सिकद्वारे या फोटोची पडताळणी केली असता या फोटोतील खालील भाग यात एडिट केला असल्याचे दिसून येत आहे.

याचाच अर्थ फोटोत दिसत असलेला फलकाचा भाग एडिट करण्यात आहे हे स्पष्ट दिसत आहे. तींत्रव गावात वंचित बहूजन आघाडी व्यतिरिक्त अन्य पक्षाच्या उमेदवारांना बंदी घालण्यात आली आहे का याचा शोध घेतला असता कोणत्याही स्थानिक वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले असल्याचे दिसून आले नाही. दैनिक सामपत्रच्या संकेतस्थळाने तींत्रव गावात तीव्र पाणीटंचाई असल्याचे वृत्त दिल्याचे आढळून आले. या व्यतिरिक्त तींत्रव गावाविषयी कोणतेही वृत्त आढळून आलेले नाही.

आक्राईव्ह लिंक

शेगांव ग्रामीण पोलिसांच्या 07265-253010 या क्रमांकावर आम्ही संपर्क केला. त्यांनी आपल्याकडे अशा कोणत्याही घटनेची नोंद नसल्याचे 27 मार्च 2019 रोजी दुपारी एक वाजून 32 मिनिटांनी सांगितले. फोटोत दिसणारी इमारतही या गावात अस्तित्वात नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

अशा रितीने या फोटोतील मागील इमारत असलेली आणि लिखित मजकूरात बदल केलेली असंख्य छायाचित्रे आम्हाला  इंटरनेटवर आढळून आली. या फोटोतील मुळ गाव कोणते हे मात्र समजू शकले नाही.

निष्कर्ष

या छायाचित्रात बदल करण्यात आल्याचे तांत्रिक माहितीच्या आधारे सिध्द होत आहे. स्थानिक पोलिसांनीही अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आमच्या तथ्य पडताळणीत हे वृत्त असत्य आढळले आहे.

Avatar

Title:सत्य पडताळणी : तींत्रव गावात वंचित बहुजन आघाडीशिवाय इतरांना प्रचारास बंदी?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False