सत्य पडताळणी : एक डोळा उघडा ठेवत झोपतो हा मुलगा, 2 वर्षाचा असताना झाला होता acid हल्ला?

True

(छायाचित्र सौजन्य : www.rock-cafe.info)

एक डोळा उघडा ठेऊन झोपणाऱ्या आणि वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षी acid हल्ला झालेल्या एका मुलाचे छायाचित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मराठी हास्यकल्लोळ या पेजवर या मुलाचे छायाचित्र झळकले आहे. या छायाचित्रची सत्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

आक्राईव्ह लिंक

तथ्य पडताळणी

वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षी acid हल्ला झालेला हा मुलगा दिल्लीजवळील गुडगाव येथील असल्याचे डेली मेल या दैनिकाने म्हटले आहे. या मुलाला आपला एक डोळा उघडा ठेऊन झोपावे लागते असेही या वृत्तात म्हटले आहे.

आक्राईव्ह लिंक

इंडिया टूडेनेही या घटनेचे वृत्त दिले आहे. केवळ महिलांवरच acid हल्ला होतो हा गैरसमजही या वृत्ताद्वारे दुर करण्याचा प्रयत्न इंडिया टूडेने केला आहे.

आक्राईव्ह लिंक

wittyfeed.tv या संकेतस्थळानेही acid हल्ल्याबाबतचे वृत्त देताना acid हल्ल्यात जखमी होणारे 30 ते 40 टक्के पुरुष असतात याकडे लक्ष वेधलंय. या घटनांची तितकीशी दखल घेतली जात नसल्याबद्दलही या संकेतस्थळाने लिहिले आहे.

आक्राईव्ह लिंक

तथ्य पडताळणी

एक डोळा उघडा ठेऊन झोपणाऱ्या आणि वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षी acid हल्ला झालेल्या मुलाचे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले छायाचित्र सत्य असल्याचे फॅक्ट क्रेसेंडोच्या तथ्य पडताळणीत आढळून आले आहे.

Avatar

Title:सत्य पडताळणी : एक डोळा उघडा ठेवत झोपतो हा मुलगा, 2 वर्षाचा असताना झाला होता acid हल्ला?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: True