शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भांडणाचा जुना व्हिडिओ चुकीच्या संदर्भासह व्हायरल; वाचा सत्य

False राजकीय | Political

राज्यात सुरू असलेल्या राजकीय वादळादरम्यान एका उद्धघाटन समारंभा प्रसंगी दोन गटात झालेल्या धक्काबुक्कीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोबत दावा केला जात आहे की, नवी मुंबईत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये “तुंबळ मारामारी” झाली. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ सुमारे तीन वर्षे जुना असून त्यावेळी सेना आणि राष्ट्रवादी यांची युती नव्हती.

काय आहे दावा?

दोन गटातील बाचाबाची आणि धक्काबुक्कीचा व्हिडिओ शेअर करून म्हटले आहे की, “नवी मुंबईत शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये तुंबळ मारामारी. अन झाकणझुल्या म्हणतंय उद्धव ठाकरे 25 वर्ष मुख्यमंत्री राहणार.”

मूळ पोस्ट – फेसबुकफेसबुक

तथ्य पडताळणी

व्हिडिओमध्ये न्यूज अँड एंटरटेन्मेंट असा लोगो दिसतो. सर्वप्रथम या चॅनेलचा शोध घेतला असता या नावाचे एक युट्यूब चॅनेल सापडले. या चॅनेलवर 1 मार्च 2019 रोजी व्हायरल व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता. 

सोबतच्या माहितीनुसार, नवी मुंबईतील ऐरोली येथे सेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये वाद झाला होता. मूळ व्हिडिओ येथे पाहा –

एबीपी माझा चॅनेलनेही हा व्हिडिओ प्रसारित केला होता. बातमीनुसार, नवी मुंबई महापालिकेच्या एका सभागृहाच्या उद्घाघानाप्रसंगी 1 मार्ज 2019 रोजी हा वाद झाला होता. महापालिकेत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिवेसेना खासदार व इतर नेत्यांची वाट न पाहताच उद्घाघाटन करण्याचा प्रयत्न करण्यावर सेना कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला होता.

दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांमध्ये वाद चिघळल्याने हाणामारी व धक्काबुक्की झाली. राष्ट्रवादी आमदार संदीप नाईक यांच्या गाडीचीही या वेळ तोडफोड करण्यात आली. दोन्ही गटांविरोधात ऐरोली पोलिस ठाण्यात त्यावेळी गुन्हा नोंदविण्यात आला होता. सविस्तर वृत्त येथे वाचू शकता.

मे महिन्यात वर्षा निवासस्थानी पार पडलेल्या शिवेसेनेच्या जिल्हाप्रमुखांच्या एका बैठकीत उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य केले होते की, पुढची 25 वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री राहील असं काम करा.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, तीन वर्षे जुना सध्याच्या तापलेल्या राजकीय परिस्थितीदरम्यान चुकीच्या संदर्भासह शेअर केला जात आहे. त्यावेळी सेना आणि राष्ट्रवादी यांची युती नव्हती. नोव्हेंबर 2019 मध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती झाली होती. 

Avatar

Title:शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भांडणाचा जुना व्हिडिओ चुकीच्या संदर्भासह व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Agastay Deokar 

Result: False